आज लीप दिवसआजचा दिवस वर्षातील उर्वरित ३६५ दिवसांपेक्षा वेगळा आहे. याचं कारण म्हणजे २९ फेब्रुवारीचा दिवस चार वर्षांनी एकदाच येतो.
February 29, 2024
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्या५साठी साप्ताहिक ‘नवयुग’ कमी पडू लागले म्हणून शिवाजी पार्कच्या सभेत मे १९५६ मध्ये सेनापती बापट यांनी आचार्य अत्रे यांना सुचवले की, लढा यशस्वी करायचा असेल तर एक दैनिक सुरू करा. आचार्य अत्रे यांनी घोषणा केली, ‘१५ नोव्हेंबरपासून ‘मराठा’ नावाचे दैनिक सुरू करेन.’
November 15, 2021
मुंबईत त्या वेळी अनेक अशी हॉटेल्स होती जी फक्त युरोपीयन मंडळींसाठी मर्यादित असत. त्यापैकी एक असलेल्या वॅटसन हॉटेलमध्ये जमशेटजींना भारतीय असल्याने वंशभेदाचा अनुभव आला. त्यामुळे स्वदेशी पंचतारांकित हॉटेलची कल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणायचं ठरवलं.
October 16, 2021
भारतीय सिनेमाच्या क्षेत्रात इतिहास घडवणाऱ्या शोले सिनेमाला आज तब्बल ४६ वर्षे पूर्ण झाली. पण अजूनही प्रेक्षकांच्या मनावरचे या सिनेमाचे गारूड कमी झालेले नाही. काय आहे ते गारूड?
१५ ऑगस्ट १९७५ रोजी म्हणजे चाळीस वर्षांपूर्वी भारतीय चित्रपटसृष्टीत महत्त्वाचा टप्पा ठरलेला ‘शोले’ हा जी.पी. सिप्पी यांचा चित्रपट मुंबईच्या मुंबई सेंट्रल भागातील मिनव्र्हा या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. चित्रपटगृहात शोले पाच वर्षे दाखवला जात होता. पन्नासच्यावर चित्रपटगृहात त्याचा रौप्यमहोत्सवही साजरा झाला. या चित्रपटाने पूर्वीचे लोकप्रियतेचे बरेच रेकॉर्ड मोडून स्वत:चा असा विक्रम प्रस्थापित केला. आजही अनेकदा शोले एखाद्या चॅनल वर चालुच असतो. आजवर आपल्या बॉलीवूड मध्ये हजारो चित्रपट झाले... पण " शोले" आजही आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहे. शोले मात्र असा आठवणीत राहिलेला पहिल्या क्रमांकाचा चित्रपट आहे.
कारण एकच त्यातील 'टिमवर्क'
शोलेएवढे प्रचंड यश आतापर्यंत एकाही हिंदी किंवा भारतातल्या प्रादेशिक भाषेतल्या चित्रपटाला मिळालेले नाही. शोलेनंतर हजारो हिंदी चित्रपटांची निर्मिती झाली. ते पडद्यावर आले आणि गेले. त्यातल्या फारच थोड्या चित्रपटांची आठवण लोकांना आहे. या चित्रपटाला एवढे प्रचंड यश मिळेल, असे दिग्दर्शक रमेश सिप्पी आणि चित्रपटात भूमिका केलेल्या अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमामालिनी, जया बच्चन यांच्यासह अन्य कलाकारांनाही स्वप्नातही वाटले नव्हते.
दरोडेखोरांचा नायक, त्या दरोडेखोरांच्या वारंवार होणार्याक हल्ल्यांनी संत्रस्त झालेले गाव, त्या दरोडेखोरांच्या म्होरक्याला गब्बर सिंग याला एकदा तुरुंगात डांबणारा माजी पोलीस अधिकारी ठाकूर आणि या दरोडेखोरांना संपवायसाठी आलेले जय आणि विरू, हे दोन तरुण यांच्याभोवती ही कथा संघर्षासह सतत शेवटपर्यंत फिरत राहते. ज्या गब्बरने आपले हात तोडले, त्याचाच सूड ठाकूर कसा घेतो, याचे चित्रीकरण प्रेक्षकांना विलक्षण आवडले होते.
गब्बर सिंगची अमजद खानने केलेली भूमिका तर गाजलीच, पण त्याचे संवादही प्रंचड गाजले. समाजावर प्रभाव टाकणार्याक संवादाचे लेखन जावेद अख्तर आणि सलीम खान या जोडीने केले होते. ग्रामीण भागात घडणारी ही कथा शहरी भागातही लोकप्रिय झाली. शोले का चालला? हे अजूनही कळत नसल्याची कबुली रमेश सिप्पींनी दिली आहे तर या चित्रपटाच्या यशामागचे रहस्य जपानी दिग्दर्शक अकिरा कुरोसावा यांच्या कथेत दडलेले असल्याने, या चित्रपटाचे यशही त्यांनाच माहिती असावे. सगळ्यांना या चित्रपटातले नेमके काय आवडते, हे सांगणे हे खरेच खूप कठीण आहे, अशा शब्दात महानायक अमिताभ बच्चन यांनी शोलेच्या लोकप्रियतेचे रहस्य गवसत नसल्याची कबुली देऊन टाकली.
जपानी चित्रपट निर्माता अकिला कुरोसावा यांच्या सेव्हन समुराई या चित्रपटावरूनच शोले साकारला गेला. याच चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी अभिनेत्री हेमामालिनी आणि धर्मेन्दचे प्रेम बहरले आणि पुढे हे दोघे विवाहबद्ध झाले. गब्बर आणि त्याच्या डाकू सहकार्याअतले संवाद तर लाखो प्रेक्षकांना तोंडपाठ होते. अरे ओ सांबा, कितने आदमी थे? असे गब्बर आपल्या सहकार्यााला विचारतो. तो सांगतो, दो! आदमी चार और वो दो, फिर भी खाली हाथ चले आए? तेरा क्या होगा कालिया? अरे ओ सांबा, कितना इनाम रख्खा है सरकारने हमपर? हे त्याचे रांगडे संवाद प्रेक्षकांना विशेष आवडले होते.
ये दोस्ती, हम नही तोडेंगे, कोई हसीना जब रुठ जाती है तो, ही या चित्रपटातली गाणीही लोकप्रिय झाली होती. पाण्याच्या टाकीवर चढून विरूने (धर्मेंद्र)ने केलेला तमाशाही प्रेक्षकांना आवडला होता. इतना सन्नाटा क्यूँ है भाई, या चाचाचा प्रश्नर (ए. के. हंगल) प्रेक्षकांनाही सुन्न करून टाकणारा ठरला होता. शोलेच्या संवादाची एलपी निघालेली होती आणि तिचाही खप देशभरात खूपच झालेला होता. यशाचे हे शोले भारतीय चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरले आहे.
संकलन : संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
https://www.youtube.com/watch?v=0OyJgWmZH0s
August 15, 2021
(एनआयओ) अर्थात राष्ट्रीय सागरशास्त्र/समुद्र विज्ञान संस्था चे मुख्यालय डोना पॉला, गोवा येथे समुद्र किना-यापासून जवळ वसलेली असून , केंद्र सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद ( सीएसआयआर) च्या अंतर्गत असलेल्या ३७ प्रयोशाळांपैकी एक आहे .
January 1, 2022
आज दिनांक ६ ऑक्टोबर. १९२१ साली याच दिवशी न्युयॉर्कमध्ये उच्चभ्रु असं ब्रोडवे थिएटर उभारण्यात आलं होतं. त्या थिएटरचं नाव होतं न्यु सेंच्युरी थिएटर. हे थिएटर न्युयॉर्कमधील नावाजलेलं शहर मॅनहॅटन येथे वसलेलं होतंं. थिएटरची आसन व्यवस्था १७०० इतकी होती. या संपूर्ण थिएटरचं स्थापत्य हबर्ट जे. क्रॅप यांचं होतं आणि या थिएटरवर मालकी हक्क शुबर्ट या संस्थेचा होता.
October 6, 2020
प्रथमपासून संघ राजकीय नाही असेच सतत सांगत राहिला. अश्या प्रकारे संघाने स्वतःची एक ‘विशिष्ठ प्रतिमा’, ‘खास चारित्र’ निर्माण केले आहे.
September 27, 2021
नाटकाचा विषय असलेला बाइंडर वाईला राहायचा, खाणावळ चालवायचा. म्हणजे त्याने त्या वेळी ठेवलेली बाई ती खाणावळ चालवायची. तेंडुलकर या बाइंडराला भेटले होते. त्यांना तो चांगलाच लक्षात राहिला होता. तो तऱ्हेवाईक होता म्हणून नव्हे, तर तो ‘खरा’ होता, म्हणून.
March 10, 2022
६६ वर्षापूर्वी ३ डिसेंबर १९५२ रोजी ‘बिनाका गीतमाला’ची सुरुवात रेडीओ सिलोन वरून झाली आणि चित्रपट संगीताची थक्क करून सोडणारी अफाट लोकप्रियता जगासमोर आली. हिंदी चित्रपट संगीताच्या इतिहासात बिनाका गीतमाला ‘माइलस्टोन’च्या रूपाने उभी आहे आणि अमीन सयानी त्याचे अविभाज्य घटक आहेत.
February 25, 2019
राष्ट्रीय युद्ध स्मारकाची निर्मिती करण्याबाबत १९६८ मध्ये चर्चा झाली होती. मात्र, प्रत्यक्षात २०१५ मध्ये या स्मारकाच्या बांधकामाला सुरुवात झाली.राष्ट्रीय युद्ध स्मारकात चार वर्तुळ असून, त्यांना ‘अमर चक्र’ ‘वीरता चक्र’ ‘त्याग चक्र’ आणि ‘रक्षक चक्र’ अशी नावे देण्यात आली आहेत.
March 1, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti