लालबहादूर शास्त्री व पाकिस्तानचे राष्ट्रपती अयुबखान यांच्यामध्ये सोव्हिएट महामंत्री कोसिजिन यांच्या मध्यस्थीने ४ जानेवारी १९६६ पासून वाटाघाटी होऊन १० जानेवारीस नऊ कलमी करारावर उभय नेत्यांनी सह्या केल्या.
January 10, 2022
बायो डीझेल म्हणजे अपारंपारिकरित्या मिळवलेले इंधन.
कुठल्याही वनस्पतीजन्य तेलाचे ट्रांसईस्टरिफिकेशन या रासायनिक प्रक्रियेद्वारे मोनो अल्कलीमध्ये रुपांतर केले तर मिळणारा पदार्थ म्हणजे बायो डिझेल. बायो डिझेलचे इंधन गुणधर्म हे पेट्रोलियम डीझेलसारखे असतात. मात्र यात गंधकाचे प्रमाण नगण्य असते. म्हणून सल्फर अथवा गंधकाचे हवेतले प्रदूषण होत नाही. यासाठी लागणारे तेल हे वनस्पतीजन्य (तेल बिया) असल्याने हा नैसर्गिक व अपारंपारिक असा उर्जास्त्रोत आहे.
अमेरिकेत मका तसेच सोयाबीनचे तेल यासाठी वापरले जाते. तर पाम तेलाचा वापर युरोप खंडातील देश आणि भरपूर उपलब्धी मुळे मलेशियामध्येकरतात. भारतात खाद्यतेल बिया बायो डिझेलसाठी वापरल्या जात नाहीत त्या ऐवजी करंजी नामक झाडापासून मिळणाऱ्या बियांचा वापर केला जातो. मर्सिडीज ह्या प्रतिष्ठीत मोटारींच्या उत्पादकांकडून प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आलेल्या बायो डिझेलच्या प्रोजेक्ट यशस्वी झाला आहे.
बायो डिझेलच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या करंजीच्या लागवडी संदर्भात शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन व्हावे, म्हणून ही कंपनी एनजीओच्या माध्यमातून उपक्रम राबवते आहे. सुरुवातीला महाराष्ट्र आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये हा उपक्रम राबविला जाईल. पडीक जमिनीमध्ये करंजीची लागवड करता येते, त्यामुळे शेतकऱ्यांना त्यातून उत्पन्न मिळवता येईल. डेम्लर क्रायस्लर इंडिया या कंपनीने आतापर्यंत काही बायोडिझेलचे प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबवले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
August 10, 2021
रेल्वेचा उगम इंग्लंडमध्ये झाला. इ.स. १७८४ मध्ये पोस्टाची पत्रे घेऊन जाणाऱ्या घोडागाड्यांचे वेग वाढविण्यासाठी रस्त्यांमधे लाकडी फळ्या अंथरून त्यावरून या घोडागाड्यांना पळविले जाई.
March 13, 2023
कारवार सोडून आणखी दक्षिणेला गेलं की उत्तर कन्नडा आणि दक्षिण कन्नडा जिल्ह्यांमधे आणि पुढे थेट केरळपर्यंत जिथे गौड सारस्वत ब्राह्मणांची वस्ती आहे, तिथे तिथे कोकणी आहेच! पण उच्चार मात्र अगदी वेगळे. त्या भागात तिची लिपी मात्र कानडी असते. किंवा केरळमधे तर मल्याळम. मजा म्हणजे कर्नाटकातले इतर लोक या गौड सारस्वत ब्राह्मणाना चक्क ‘कोकणी लोक’ असं म्हणतात. या गौड सारस्वतांची वस्ती बंगालमधे कधीच्या काळी म्हणजे गोव्यात येण्यापूर्वी होती असं म्हणतात. म्हणूनच त्यांच्या नावात ‘गौड’ शब्द आला. हे गौडबंगाल काय आहे मला माहिती नाही!
April 9, 2022
२६ व्या ओव्हर मध्ये कपिल देव यांनी आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर कपिल देव यांनी गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरु केली. पुढचे अर्धशतक त्यांनी फक्त १३ ओव्हर मध्ये पूर्ण केले. त्यानंतरच्या ५० धावा फक्त १० ओवरमध्ये पूर्ण केल्या.
June 18, 2022
जानेवारी १९७१ ते ५ जानेवारी १९७१ या दरम्यान ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या दोन संघांदरम्यान होणाऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या चार दिवसांचा खेळ पावसामुळे होऊ शकला नाही. प्रेक्षकांचे पैसे वसूल होण्याच्या दृष्टीने मर्यादित षटकांचा सामना खेळवण्याची एक कल्पना एका भन्नाट डोक्यातून निघाली. तिला मूर्त स्वरूप येऊन ५ जानेवारी १९७१ रोजी प्रत्येकी ४० षटकांचा एक सामना वरील दोन्ही संघांदरम्यान खेळला गेला.
January 5, 2022
मुंबईत त्या वेळी अनेक अशी हॉटेल्स होती जी फक्त युरोपीयन मंडळींसाठी मर्यादित असत. त्यापैकी एक असलेल्या वॅटसन हॉटेलमध्ये जमशेटजींना भारतीय असल्याने वंशभेदाचा अनुभव आला. त्यामुळे स्वदेशी पंचतारांकित हॉटेलची कल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणायचं ठरवलं.
October 16, 2021
पिंपरी-चिंचवड नगरपालिकेची स्थापना लोकनेते आण्णासाहेब मगर यांनी ४ मार्च १९७० साली पिंपरी, चिंचवड, भोसरी, आकुर्डी-निगडी ही गावे एकत्र करून केली. शासकीय समितीने १९७० ते १९७८ पर्यंत कारभार केल्यानंतर २० मार्च १९७८ मध्ये नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली.
October 11, 2021
सबस्टॅण्डर्ड’ आणि ‘सेकण्डस्’ असे शिक्के त्या कापडाच्या प्रत्येक मीटरवर मारलेले असतात. ते बघून त्यानुसार त्याला दर देणे जागरुक ग्राहकाचे लक्षण आहे. अन्यथा व्यापाऱ्यांकडून याबाबतीत सर्रास फसवणूक होते
April 4, 2023
दोन रेल्वे रुळांमधील अंतर सारखे राहण्यासाठी स्लिपर्सचा वापर केला जातो. सर्वात प्रथम लाकडी स्लिपर वापरले गेले. डॉग स्पाईक नावाच्या मोठ्या खिळ्यांनी त्यावर रूळ बसविले जायचे. या स्लिपरचे आयुष्य दहा ते १५ वर्षांचे असते. हळूहळू लाकडी स्लिपरऐवजी स्टील स्लिपर अथवा कास्ट आयर्न स्लिपरचाही वापर सुरू झाला.
जसजशी रेल्वे प्रणालीमध्ये सुधारणा होत गेली तसतसे या गोष्टींचेही आधुनिकीकरण करण्याची जरूर भासू लागली. कारण या स्लिपर्स अतिवेगाने जाणाऱ्या गाडयांसाठी कमकुवत ठरु लागल्या. त्यामुळे भारतीय रेल्वे बोर्डाने तज्ज्ञांची एक समिती नेमली. त्यांनी कॉंक्रिटचे स्लिपर्स वापरण्यासंबंधी सूचना केली. लाकडी स्लिपरऐवजी काँक्रिटचे स्लिपर वापरण्याने जंगलतोड वाचणार होती आणि ट्रकचे आधुनिकीकरण पुढे नेता आले असते.
अशा तऱ्हेने १९६४-६५ च्या सुमारास हे स्लिपर्स प्रायोजिक तत्वावर वापरणे सुरू झाले. काँक्रिट स्लिपर्सचे आयुष्य ५० वर्षांचे असते. त्यामुळे खर्चात बचत झाली.
काँक्रिटच्या स्लिपर्समध्येही दोन प्रकार होते. एका प्रकारात दोन ब्लॉक होते. ते एका लोखंडी पट्टीने जोडावे लागायचे. तर दुसरा सलग ब्लॉक लाकडी स्लिपरप्रमाणे असे. नंतर त्यात सुधारणा करुन प्रीस्ट्रेस्ड काँक्रिटच्या स्लिपर्स बनवल्या गेल्या. काँक्रिटच्या स्लिपर्स अधिक ताकदवान असून वजनाने हलक्या असतात.
१९८०-९० मध्ये सुप्रीम कोर्टाने लाकडी स्लिपर्स वापण्यावर बंदी आणली. त्यामुळे आता भारतीय रेल्वेमध्ये सर्वत्र नव्या स्लिपर्स काँक्रिटच्याच वापराव्या असा दंडक आहे.
आता हळूहळू मुख्य मार्ग, मग दुय्यम मार्ग अशा तऱ्हेने लाकडी, लोखंडी व स्टील स्लिपर्स काँक्रिटच्या स्लिपर्सने बदलले जात आहेत.
कोकण रेल्वे ही पहिल्यापासून १५० किलोमीटर वेगाने गाडया जातील अशा हिशेबाने त्यातील सर्व यंत्रणा तयार केली असल्याने तेथे पहिल्यापासूनच काँक्रिटचे स्लिपर्स वापरले गेले आहेत.
आता भारतात मालाच्या वाहतुकीसाठी दिल्ली-कोलकता आणि मुंबई-दिल्ली असे दोन स्वतंत्र मार्ग बनविले जात आहेत. त्यांच्यासाठी आणखी शक्तिशाली आणि प्रभावी स्लिपर्स लागणार असून तसे ते बनविले जातील.
लाकडी स्लिपरऐवजी सिमेंटचे स्लिपर घाालणे केव्हा सुरू झाले ?
April 5, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti