१८८० साली पुणे मुक्कामी अण्णासाहेब किर्लोस्करांनी ‘इंद्रसभा’ नावाचे पारसी नाटक – उर्दू भाषेतील – पाहिले आणि तशा प्रकारचे नाटक मराठी रंगभूमीवर का होऊ शकत नाही, या ईर्ष्येने एकटाकी ‘संगीत शाकुंतल’ या नाटकाचा पहिला अंक लिहून काढला.
October 31, 2021
ऑलिम्पिकचे जनक बॅरन कुबर्टिन यांनी २३ जून १८९४ साली आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना केली. त्या दिवसाच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस साजरा केला जातो.
June 23, 2021
Mutt म्हणजे दोन वेगळ्या जातीच्या संबंधातून निर्माण झालेली प्रजाती. मुळात ती मुद्दाम प्रस्थापित न केलेल्या पण सहज प्रस्थापित झालेल्या संबंधातून निर्माण झालेली प्रजाती असते. हा दिवस मिश्र जातीच्या कुत्र्यांना वर्षातून दोनदा प्रेम करण्यासाठी आणि आनंद साजरा करण्यासाठी प्रोत्साहित करतो.
July 31, 2020
‘व्हॅलेंटाइन्स डे’च्या केवळ एक दिवस आधी येणारा किस डे हा दिवस म्हणजे प्रेमाचा शेवटचा टप्पाच म्हणावा लागेल. आज याच किस डे निमित्त किस या शब्दाचा उगम कसा झाला याबद्दल बघू.
किस (Kiss) हा शब्द जुन्या इंग्रजीमधील ‘सीसन’ (cyssan) या शब्दापासून जन्माला आला आहे. ‘सीसन’चा अर्थ होतो चुंबन घेणे. पण आता हा सीसन शब्द कुठून आला याबद्दल ठोस माहिती कोणालाच नसली तरी अनेकांच्या मते चुंबन घेताना लोक जो आवाज करतात त्यावरून या मूळ शब्दाची निर्मिती झाली असणार.
रोमन लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या चुंबनासाठी वेगवेगळे शब्द वापरले. जसे हात किंवा गालावर घेतलेल्या चुंबनाला बासीयम (basium) म्हणत तर चुंबन घेताना तोंड बंद केल्यास त्या चुंबनाला ऑस्कूलम (osculum) म्हणून संबोधले जात असे. तर उत्साहाने (उत्कट भावनेने) घेतलेल्या चुंबनाला सेव्हील्यूम (saviolum) म्हणून ओळखले जात असे.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
February 13, 2022
आज नेदरलँड्स प्रिंस ऑफ ऑरेंज म्हणजेच राजा विल्यम अलेक्झांडर यांचा वाढदिवस किंग्ज डे म्हणून साजरा केला जातो.
डच लोक त्यांच्या राजाचा वाढदिवस साजरा करतात तेव्हा किंग्ज डे असतो. राजा विल्यम अलेक्झांडर यांचा जन्म २७ एप्रिल १९६७ रोजी झाला. विल्यम अलेक्झांडर हे क्वीन बीट्रिक्स आणि प्रीन्स क्लॉस यांचा मोठे चिरंजीव होत. विल्यम अलेक्झांडर हे त्यांच्या तरुण वयात ‘रॉयल नेदरलँड्स नेव्ही’त काम करत होते. पुढे त्यांना लेफ्टनंटची पदवी मिळाली. विल्यम यांना पायलट बनण्याची इच्छा होती. एका मुलाखती दरम्यान त्यांनी सांगितले होते की ‘मी जर राजा नसतो तर पायलट नक्कीच झालो असतो.’ते २० वर्षांपासून छंद म्हणून के.एल.एम मध्ये पायलट म्हणून काम करत होते. के.एल.एम पूर्वी ते 'मार्टिन एयर'साठी अतिथी पायलट म्हणून काम करत असत. तेथे विल्यम नेहमी मुख्य पायलटच्या सहाय्यकाची भूमिका बजावत असत. त्यांनी मेडिकल रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशनमध्येही काम केले आहे. ऐंशीच्या दशकात, विल्यम अलेक्झांडर यांनी केनियामधील आफ्रिकन मेडिकल रिसर्च एज्युकेशन फाउंडेशनतही काम केले आहे. यानंतर त्यांनी केनिया वाइल्ड लाइफ सर्विस साठी काही दिवस काम केले आहे. विल्यम अलेक्झांडर जल व्यवस्थापन तज्ञ पण आहेत.विल्यम अलेक्झांडर २०१३ मध्ये नेदरलँड्सचे राजे झाले. विल्यम अलेक्झांडर नेदरलँड्सच्या इतिहासातील चौथे राजे आहेत. विल्यम अलेक्झांडर हे १८९० साला नंतर (१२२ वर्षे) नंतर पहिले राजे होत. याच्या आधी बिएट्रिक्स (१९८० ते २०१३), त्यांची आई जूलियाना (१९४८ ते १९८०) आणि आजी विल्हेल्मिना ( १८९० ते १९४८) या नेदरलँडच्या राण्या होत्या.
राजा विलेम-अलेक्झांडर यांनी राणी मॅक्सिमा सोबत २ फेब्रुवारी २००२ मध्ये लग्न केले. त्यांची पत्नी मॅक्सिमा अर्जेटिनामध्ये बँकर होती. विल्यम अलेक्झांडर यांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये सपत्नीक भारताला भेट दिली होती.
नेदरलँड्स प्रिंस ऑफ ऑरेंज म्हणजेच राजा विल्यम -अलेक्झांडर हे स्वत: आपल्या कुटुंबा समवेत दर वर्षी नेदरलँड्स मधील एका शहराला भेट देतात. या वर्षी ते आइंडहोवनला भेट देणार आहे.
या दिवसा सोबतच नेदरलँड्स मध्ये दरवर्षी ३० एप्रिलला क्वीन डे म्हणून साजरा केला जातो.
डच भाषेत Fijne Koningsdag! म्हणजेच हॅपी किंग्ज डे (Happy King’s Day!)
April 27, 2022
पुण्यातील नाना पेठ परिसरातील ऐतिहासिक सिटी चर्चने आज २२७ वर्षे पूर्ण केली आहेत. पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील क्वार्टरगेट जवळील ऑर्नेलाज हायस्कूल शेजारी हे भव्य कॅथोलिक चर्च उभे आहे. "इमॅक्युलेट कन्सेप्शन ऑफ मदर मेरी" चर्च असेही याला संबोधले जाते. विशेष म्हणजे या सिटी चर्चच्या सभोवताली मोठी मुस्लिम वस्ती असून चर्चच्या कम्पाऊंड व भिंत व बाजूच्या मशिदीची भिंत एकच आहे. धार्मिक सलोख्याचे हे विलोभनीय उदाहरण मानावे लागेल.
पुण्यातील सिटी चर्चचा इतिहास :
पुण्यातील सिटी चर्चसाठी सवाई माधवराव पेशवे यांनी सुमारे चार एकर जागा दिली होती. अटकेपार झेंडे लावणाऱ्या पराक्रमी श्रीमंत पेशव्यांच्या फौजेत डॉम मॅन्यूल डि नोव्हो हा पोर्तुगीज लष्करी अधिकारी सेवेत होता. पोर्तुगीजांच्या ताब्यातील गोवा आणि उत्तर कर्नाटक येथून श्रीमंत पेशव्यांच्या फौजांसाठी सैन्यभरती करीत असत. त्यामुळे पेशव्यांच्या फौजांमध्ये अनेक पोर्तुगीज व ख्रिस्ती सैन्य असायचे. पोर्तुगीज अधिकारी डॉम मॅन्यूल डि नोव्हो हा साऱ्या सैन्याच्या गरजांकडे लक्ष देत असे.
सैन्यातील ख्रिश्चनांची गरज त्यांनी श्रीमंत पेशव्यांच्या कानावर घातली आणि श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी या मागणीस तत्काळ मान्यता देऊन सध्याच्या नाना पेठेत चार एकर जागा कॅथोलिक चर्च बांधण्यासाठी दिली. तसेच आपले कारभारी नाना फडणवीस यांना सांगून आर्थिक मदत दिली. तेथे ८ डिसेंबर १७९३ मध्ये सध्याच्या चर्चची पायाभरणी होऊन प्राथमिक शेड बांधली गेली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने बांधकाम होत प्राथमिक चर्चची वास्तू आकारास आली.
पेशव्यांनी दिलेल्या जागेवर पायाभरणी करून बांधलेल्या शेडमध्ये २५ डिसेंबर १७९२ मध्ये उल्हासात ख्रिसमस साजरा करण्यात आला. चर्चची उभारणी करण्यासाठी उपस्थित ख्रिश्चन बांधवांनी वर्गणी काढून निधी उभारला. तेव्हा सुध्दा त्यात श्रीमंत माधवराव पेशव्यांनी देखील त्यात सढळ हाताने वैयक्तिक आर्थीक मदत केली. सुमारे वर्षभरात सन १७९३ मध्ये चर्चची बांधणी पूर्ण झाली. त्यानंतर दरवर्षी ८ डिसेंबर रोजी स्थापना दिन आणि २५ डिसेंबरला ख्रिसमस येथे साजरा होतो व त्यात श्रीमंत पेशव्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. या चर्चचा विस्तार ब्रिटिश सत्तेच्या कालावधीत होऊन १८५२ मध्ये दगडी इमारत झाली म्हणजे तब्बल १०० वर्षांनी आजचे चर्च आकारास आले.
गेल्या २२७ वर्षांत येथे रोज प्रार्थना व विविध धार्मिक सामाजिक उपक्रमाची परंपरा चालू आहे. सर्व जाती धर्मांमध्ये येथे सलोखा निर्माण करण्यातही या सिटी चर्चचा सदैव पुढाकार राहिला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
https://youtu.be/CZTyUzFmkXQ
December 8, 2021
२१ डिसेंबर १९६५ रोजी दादा कोंडके निर्मित व दिग्दर्शित आणि वसंत सबनीस लिखित 'विच्छा माझी पुरी करा' या नाटकाचा पहिला प्रयोग धोबीतलाव येथील रंगभवन येथे झाला. वसंत सबनीस यांचे 'विच्छा माझी पुरी करा' हे नाटक म्हणजे सबनीसांच्याच छपरी पलंगाचा वगाचीच रंगावृत्ती आहे. याचे संगीतकार होते तुकाराम शिंदे. ‘विच्छा माझी पुरी करा’ नाटकाने दादा कोंडके यांना सुपरस्टार रंगकर्मी बनवले. दादा कोंडके यांनी या लोकनाट्याचा कुठंही प्रयोग लावला तरी तो हाऊसफुल व्हायचा. त्या काळात दादा कोंडके यांचे प्रतिस्पर्धी असणाऱ्या नाट्यनिर्मात्यांच्या नाटकांचा तिकीटांचा दर थोडा चढा असायचा. मात्र दादांनी आपल्या या लोकनाट्यासाठी अगदी ‘जनता दर’ लावला होता. त्यामुळे त्यांचा प्रत्येक प्रयोग लगेचच हाऊसफुल व्हायचा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दादांच्या लोकनाट्याची ‘प्रॉडक्शन कॉस्ट’ खूप कमी होती. रंगमंचाच्या पाठच्या बाजूला एक पडदा असलं की दादांचं काम होऊन जायचं.
गायिका आशा भोसले यांनी एकदा ‘विच्छा…’चा प्रयोग पाहिला. फक्त एक माणूस प्रेक्षकांना तब्बल साडे चार तास हसवतो, नुसतंच हसवत नाही तर प्रेक्षक खुर्चीवरून खाली पडायचाच तो काय बाकी असतो. अशाप्रकारचं दृश्य आशाताईंनी पहिल्यांदाच पाहिलेलं होतं. हा अनुभव आशाताईंनी प्रख्यात दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांच्या कानावर घातला आणि त्यांनाही हे लोकनाट्य पाहण्याचा आग्रह केला. त्यानुसार काही दिवसांनी आशाताई भालजींसह पुन्हा हे नाटक पाहायला आल्या. ते एवढं रंगलं की आशाताईंनी खूश होऊन दादांच्या युनिटमधील सगळ्यांच्या हातामध्ये सोन्याचं ब्रेसलेट घातलं. त्या नंतर गायिका आशा भोसले यांनी त्या काळी ‘विच्छा माझी पुरी करा' ’चा मुंबईतला एकही प्रयोग पाहायचा सोडला नव्हता. याच सुमारास भालजी ‘तांबडी माती’ या चित्रपटाची निर्मिती करीत होते. दादा किती कमालीचे कलाकार आहेत, हे एव्हाना भालजींना समजलं होतं. त्यामुळे त्यांनी या चित्रपटामधील एका महत्त्वाच्या व्यक्तिरेखेसाठी दादांची निवड केली. दादांनी याच चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.
दादा कोंडके, राम नगरकर यांनी हे नाटक गाजवले होते. राजकीय परिस्थितीवर मार्मिक पद्धतीने भाष्य करत, हळूच चिमटे काढत प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणारे 'विच्छा माझी पुरी करा' हे सदाबहार वगनाट्य सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. त्यांच्यानंतर अभिनेते विजय कदम गेली काही वर्षे सातत्याने 'विच्छा माझी पुरी करा'चे प्रयोग करत होते. 'विच्छा माझी पुरी करा' हे लोकनाट्यातील महत्त्वाचे नाटक आहे.
आजपर्यंत अनेकांनी या नाटकाचे प्रयोग केले गेले. या वगनाट्याची कथा, त्यातील राजकीय भाष्य आज ही ताजे वाटते. एकेकाळी तमाशा,वगनाट्य हे ग्रामीण आणि असभ्य कलाप्रकार आहेत अशी शहरी समाजाची विचारसरणी होती. परंतु "विच्छा माझी पुरी करा" या नाटकाने ही विचारसरणी बदलण्याचं फार मोठं कार्य करत लोकनाट्य शहरी पांढरपेशी समाजापर्यंत पोहोचवले.कुठलीही कला जितकी आत्यंतिक लोकल असते, तितकेच तिला ग्लोबल अपील असते कारण ती जनसामान्यांच्या संवेदनांशी नाते सांगते. हीच गोष्ट पुन:पुन्हा कराव्याश्या वाटण्या-या "विच्छा माझी पुरी करा"या नाटकाने सिद्ध केली आहे! आणि हेच या नाटकाच सर्वात मोठं बलस्थान आहे. एक दोन नव्हे, तब्बल ५२ वर्षे या वगनाट्याने मराठी प्रेक्षकांना झपाटून टाकलं.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
December 21, 2017
हस्ताक्षराचा अंत जवळ आला आहे, हे कळूनसुद्धा अमेरिकेत पन्नास वर्षांपूर्वी एक चळवळ उभी राहिली. ही मंडळी दरवर्षी २३ जानेवारीला ‘जागतिक हस्ताक्षर दिन’ साजरा करतात. एकमेकाला स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिलेली कविता देतात, एकमेकाला एखादे पेन भेट म्हणून देतात, हस्ताक्षराची स्पर्धा लावतात.
January 23, 2022
१९९६ च्या मार्च महिन्यातील संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिवेशनात २१ नोव्हेंबर ला जागतिक दूरदर्शन दिनाची साजरा करण्याची घोषणा झाली होती. या दिवशी विश्वा दूरदर्शन सभा भरविण्यात आली होती. १९९६ साली दूरदर्शनचा ‘इडियट बॉक्स’ खेडोपाड्यात पोहोचला नव्हता व म्हणून प्रस्तुत दिनाची ‘‘श्रीमंतांचा दिवस’’ अशी हेटाळणी देखील झाली होती.
जॉन लॉगी बेअर्डने १९२५ साली टेलिव्हिजनचा शोध लावला, तेव्हा प्राथमिक अवस्थेतील दूरदर्शनचा वापर शिक्षण, मनोरंजन नि माहिती एवढ्यापुरताच मर्यादित होता. टेलिव्हिजन शब्दाची उत्पत्ती ग्रीक व लॅटीन या दोन भाषांतील शब्दांचे एकत्रीकरण होऊन झाली आहे. ‘टेली’ या ग्रीक शब्दाचा अर्थ दूरचे तर व्हिजिओ या लॅटीन शब्दाचा अर्थ दृष्टी. त्यावरून दूरचं दाखविणारा तो टेलिव्हिजनचा खोका होय. टेलिव्हिजनचा शोध लागल्यापासून तो घरेदारे, कार्यालये, सार्वजनिक संस्था या ठिकाणी आपले स्थान हक्काने पटकावून बसला आहे. अलिकडे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्याचा क्लोज सर्किट टेलिव्हिजन (सी.सी.टी.व्ही.) हा अवतारदेखील सार्वजनिक ठिकाणी, उद्योगक्षेत्रात, मॉलमध्ये सर्रासपणे वापरला जात आहे.
प्रारंभीचा टेलिव्हिजनचा अवतार हा यांत्रिक स्वरुपाचा होता व तो सेलेनियम या धातूच्या फोटो कंडक्टिव्हिटी तत्त्वावर आधारीत होता. विलो- – स्मिथ नावाच्या तंत्रज्ञाने १८७३ साली तो शोधून काढला होता. १८८४ मध्ये जर्मनीतील पॉल गॉटलिब निपकोन याने स्कॅनिंग डिस्क शोधून काढली व त्या मॉडेलमध्ये सुधारणा केली होती. मात्र १९२५ च्या सुमारास जॉन लॉगी बेअर्ड याने या यांत्रिक खोक्यात फिरत्या प्रतिमा दाखविल्या व तोच तो खरा टेलिव्हिजन ठरला. अर्थात त्यात इलेक्ट्रोनिक्स क्रांतीनुसार उत्क्रांती होत गेली हेही तितकेच खरे आहे. ही क्रांती १९३५ पूर्वीची, १९३५ ते १९४१, दुसरे महायुद्ध, १९४६ ते १९४९, १९५० ते १९५९, १९६०-२००० अशा टप्प्यात होत गेली. आज तर टी.व्ही. कुटुंबाचा घटक बनून गेला आहे. दूरदर्शनमुळे वाचनसंस्कृती लयास गेली असा दोषारोप केला जातो.
संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
November 21, 2018
हा दिवस निवडण्याचे मुख्य कारण म्हणजे सेंट फ्लोरियन. सेंट फ्लोरियन यांचा मृत्यू ४ मे रोजी झाला, जे की एक संत आणि फायर फायटर होते. असे म्हणतात की एकदा त्याच्या गावात आग होती, त्याने फक्त एक बादली पाण्याने संपूर्ण गाव आग विझविली. त्यानंतर, युरोपमध्ये व सर्व जगात दरवर्षी ४ मे रोजी फायर फाइटर दिवस साजरा केला जातो.
May 4, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti