(User Level: User is not logged in.)

सामान्यज्ञान

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • देवधर स्कूल ऑफ इंडियन म्युझिक संस्थेचा स्थापना दिन.

    आपल्या गुरूच्या आज्ञेवरून १ जुलै १९२५ रोजी ‘देवधर स्कूल ऑफ इंडियन म्युझिक’ या संगीत विद्यालयाची स्थापना केली. गिरगावातील प्रार्थना सभेच्या जागेमध्ये विद्यालय सुरू केले. विद्यालयाचे नामकरण श्रीमती सरोजिनी नायडू यांनी केले .

      July 1, 2021


  • ९० वर्षांपूर्वीचा बोलपट ‘अयोध्येचा राजा’

    अयोध्येचा राजा या पहिल्या बोलपटात अयोध्येतील राजा हरिश्चंद्र यांच्या सत्यवादी आणि स्वत:च्या शब्दावर ठाम असणाऱ्या वृत्तीचं चित्रण यामध्ये करण्यात आलं आहे. गोविंदराव टेंबे, मास्टर विनायक, दुर्गा खोटे, बाबुराव पेंढारकर अशा कलाकार मंडळींच्या सहज-सुंदर अभिनयाने तयार झालेली ही कलाकृती म्हणजे मराठी चित्रपट विश्वातलं “मानाचं सुवर्ण पान” म्हणावं लागेल.

      February 6, 2022


  • भूगोल दिन

    २२ डिसेंबर पासून सूर्याचे उत्तरायण सुरू झाल्यामुळे हवामानातल्या संक्रमणाच्या बदलाचा प्रत्यक्ष अनुभव यायला १४ जानेवारीपासूनच आपल्याकडे सुरवात होते. म्हणूनही १४ जानेवारी या दिवसाला विशेष भौगोलिक महत्त्व आहे. याच दोन्ही गोष्टी मनात ठेवून ज्येष्ठ भूगोलतज्ञ डॉ. सुरेश गरसोळे यांनी राज्यात ‘भूगोल दिन’ साजरा करण्याची प्रथा १४ जानेवारी १९८८ पासून सुरू केली.

      January 14, 2022


  • राष्ट्रीय युवा दिवस

    युवापिढी म्हणजे नव्या विचारांची आणि आधुनिकतेची सांगड घालून आपले म्हणणे समाजापुढे मांडणारी नव्या जोशाची पिढी. खरं पाहता आपल्याला विविध प्रकारच्या क्षेत्रात चांगले यश पादाक्रांत करण्याची सुवर्ण संधी आणि पुरेसा वेळ आहे.

      January 12, 2022


  • जागतिक टेलिव्हिजन दिवस

    १९९६ च्या मार्च महिन्यातील संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिवेशनात २१ नोव्हेंबरला जागतिक दूरदर्शन दिनाची साजरा करण्याची घोषणा झाली होती. या दिवशी विश्व दूरदर्शन सभा भरविण्यात आली होती. १९९६ साली दूरदर्शनचा ‘इडियट बॉक्स’ खेडोपाड्यात पोहोचला नव्हता व म्हणून प्रस्तुत दिनाची ‘‘श्रीमंतांचा दिवस’’ अशी हेटाळणी देखील झाली होती.

      February 5, 2019


  • १ जानेवारी २००२ – युरोपातील चलनबदल

    १ जानेवारी २००२ – युरोपातील चलनबदल

    १ जानेवारी २००२ या दिवशी युरो या चलनानं त्या-त्या देशाच्या मूळ चलनाची जागा घेतली. म्हणजेच जर्मनीत १० मार्कची नोट घेऊन आता कुणी बाजारात गेलं तर त्या चलनाला काही अर्थ उरला नव्हता. फक्त युरोमध्येच सगळे व्यवहार होणार असं आता ठरलं होतं. यामुळे आता १२ देशांमधल्या साधारण ३० कोटी जनतेला फक्त युरो हे एकच चलन वापरायचं होतं.

      January 5, 2019


  • बांगलादेशची निर्मिती

    भारताने फक्त १४ दिवसातच पाकिस्तानला आपली शस्त्रे खाली ठेवण्यास भाग पाडलं. भारताने या युद्धात निर्णायक विजय मिळवला. पाकिस्तानच्या वतीने लेफ्टनंट जनरल ए.के. नियाझी यांनी शरणगतिपत्रावर सही केली. भारताने लगेचच बांगलादेशच्या स्वातंत्र्याची घोषणा केली व जगाच्या नकाशावर बांगलादेश हा नवीन देश उदयास आला.

      December 3, 2021


  • आयफेल टॉवरचे उद्घाटन

    आयफेल टॉवरचे उद्घाटन

    दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने फ्रान्सवर कब्जा केला तेव्हा फ्रेंच लोकांनी टॉवरच्या लिफ्टच्या केबल कापून टाकल्या होत्या. हेतू हा की हिटलर येईल तेव्हा त्याला पायऱ्या चढत टॉवरवर जावं लागेल. हिटलर आला, पण तो आयफेल टॉवरवर काही गेला नाही. म्हणून फ्रेंच लोकं गंमतीने म्हणतात की हिटलरने पॅरिस जिंकलं पण त्याला आयफेल टॉवर काही जिंकता आला नाही!

      March 31, 2022


  • महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणा दिवस

    स्वामी विवेकानंद म्हणतात- प्रार्थनेपेक्षा खेळ तुम्हाला देवाच्या जास्त जवळ घेऊन जाऊ शकतो. कारण प्रार्थनेमध्ये तुमचा संपूर्ण सहभाग असेलच असे नाही परंतु खेळात तो असतोच. वरील संदर्भ लक्षात घेता येथे नमूद करू वाटते की व्यक्तिमत्व विकासामध्ये बुद्धिबळाचा सिंहाचा वाटा आहे. आणि त्यामुळेच व्यक्तिमत्व विकास करण्याकरिता बुद्धिबळ हा खेळ आत्मसात करावा, जोपासावा, व्यासंग धरावा व त्याचे अनुसरण करावे.

      April 4, 2022


  • ताश्कंद करार

    लालबहादूर शास्त्री व पाकिस्तानचे राष्ट्रपती अयुबखान यांच्यामध्ये सोव्हिएट महामंत्री कोसिजिन यांच्या मध्यस्थीने ४ जानेवारी १९६६ पासून वाटाघाटी होऊन १० जानेवारीस नऊ कलमी करारावर उभय नेत्यांनी सह्या केल्या.

      January 10, 2022