मुगलएआझम या चित्रपटाचा शुभारंभ ५ ऑगस्ट १९६० रोजी मुंबईतील ‘मराठा मंदिर’ या चित्रपटगृहात झाला. आगाऊ तिकीट मिळविण्यासाठी एक लाखाहून अधिक मंडळी चित्रपटगृहाबाहेर जमली होती. उच्चभ्रू प्रतिष्ठितांना राजांच्या खलित्यासारखे, उर्दू निमंत्रण – फर्मान धाडण्यात आले होते. चित्रपटाची सर्व रिळे हत्तीच्या पाठीवरून चित्रपटगृहात आणण्यात आली. चित्रपटगृहाबाहेर शीशमहालचा सेट आणून पुन्हा उभारण्यात आला होता.
मुगल-ए-आझम बनवण्यासाठी के.असिफ यांना असंख्य अडी अडचणी येत राहिल्या. हा चित्रपट पूर्ण होण्यासाठी तब्बल १० वर्षे लागली. प्रदर्शीत झाल्यावर मात्र या चित्रपटाने अक्षरश: इतिहास घडवला. तिकीट खिडकीवरचे सर्व उच्चांक या चित्रपटाने मोडीत काढले. या चित्रपटाचे निर्माते शापूरजी पालनजी आणि दिग्दर्शक के.असिफ होते. चित्रपटाचे चित्रीकरण इतके खर्चिक होते की, निर्मात्याचे दिवाळे वाजते की काय, अशी स्थिती अनेकदा निर्माण होई. यामधील युद्धाच्या चित्रीकरणासाठी २००० उंट, ४०० घोडे आणि ८००० सैनिकांचा वापर केला गेला होता.
मधुबालाने घातलेले साखळदंड खरेखुरे होते. जोधाबाईंच्या महालातील कृष्णजन्म सोहळ्यासाठी श्रीकृष्णाची, खऱ्या सोन्याची मूर्ती वापरली गेली. सव्वातीन तासाच्या चित्रपटात सर्व गाणीच मुळी सुमारे १ तासाची होती. ‘प्यार किया तो डरना क्या’ या गाण्याच्या चित्रीकरणासाठी १५० फूट लांब, ८० फूट रुंद आणि ३५ फूट उंच असा खराखुरा शीशमहाल त्यावेळचे दीड कोटी रुपये खर्चून उभारला होता. अभिनय, कलावंताची निवड, भव्य सेटस्, रंगभूषा, वेषभूषा,अप्रतिम संगीत व गाणी, दमदार संवाद, युद्धाचे भव्य प्रसंग यातील अनेक सैनिक हे भारतीय खरेखुरे सैनिक होते. पार्श्व संगीत, पटकथा, सिनेमाटोग्राफी…दिग्दर्शन……सर्वच बाबतीत हा चित्रपट हिन्दी चित्रपट सृष्टीत मैलाचा दगड ठरला…. यात वापरण्यात आलेली प्रत्येक वस्तू खरी होती. दागिने, साड्या,तलवारी, तोफा, साखळदंड, संगीत साहित्य, शीस महल….सर्व काही अस्सल होते. अमान(झिनत अमानचे वडील), कमाल अमरोही, वजाहत मिर्झा, एहसान रिझवी यांनी त्यातील बहुतांशी संवाद उर्दूत लिहले होते. त्याकाळी व आजही हे संवाद समजायला अवघड वाटत असले तरी चित्रपट बघताना कुठेही बाधा येत नाही.
एका गाण्यात एकाचवेळी पार्श्वगायनासाठी १०० लोकांनी कोरस दिला होता….कलकत्त्याच्या एकाच सिनेमागृहात हा चित्रपट वर्षभर चालला होता. चित्रपट गृहाच्या बाहेर लावलेले भलेमोठे पोस्टर्स व बॅनर्स बघायला प्रचंड गर्दी होत असे. त्याकाळात १५ मिलीयनचे बजेट असणाऱ्या या चित्रपटाने ५५ मिलीयनचा व्यवसाय केला. नंतर २००५ मध्ये हा चित्रपट रंगीत प्रिंट मध्ये कनव्हर्ट करून पुन्हा प्रदर्शीत करण्यात आला…. अवघे ४९ वर्षे जगलेल्या के.असिफ यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीच्या २६ वर्षाच्या काळात फक्त साडेतीन चित्रपट तयार केले.
त्यांचा “लव्ह अण्ड गॉड” हा अर्धवट चित्रपट १९८६ ला प्रदर्शीत झाला होता…या चित्रपट निर्मितीची पण वेगळी कथा आहे.(लैला मजनूची कथा) …आणि त्यांनी ज्या तरूणाला आपल्या चित्रपटात संगीतकार म्हणून बोलावण्याचे वचन दिले होते तेही पूर्ण केले. ते म्हणजे संगीतकार नौशाद अली…. खरं तर मुगल-ए- आझम हा काही ऐतिहासिक चित्रपट नव्हता. अनारकली हे इतिहासातील एक संदीग्ध पात्र आहे.
अनेक इतिहासकार अनारकली ही गोष्टीतली होती असे मानतात कारण ती असल्याचे पूरावे सापडत नाहीत....पण अस्सल ऐतिहासिक वाटावा अशी पार्श्वभूमी यात होती. त्यामुळे अनारकली ही खरोखरीच होती असे या चित्रपटामुळे ठाम समजूत आजही आहे.
‘मुगल ए आझम’ या चित्रपटाचं त्याकाळी हिंदी व्यतिरिक्त अन्य दोन भाषांमध्ये डबिंग करण्यात आल्याचं सांगण्यात येतं.विशेष म्हणजे हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त अन्य भाषिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा यासाठी दिग्दर्शकांना हिंदी व्यतिरिक्त तामिळ आणि इंग्रजी भाषेमध्येही या चित्रपटाची निर्मिती व्हावी असं वाटतं होतं. त्यानुसार त्यांनी प्रयत्नही केले. मात्र त्याचे हे प्रयत्न अपयशी ठरल्याचं सांगण्यात येतं.
‘मुगल ए आझम’ या चित्रपटाच्या जाहिरातीसाठी किंवा एक आठवण म्हणून हिंदी चित्रपट सृष्टीत प्रथमच, उच्चभ्रू प्रतिष्ठितांना पत्त्यांचे २ कॅट्स पत्र्याच्या एका खास डब्यातून देण्यात आले. या पत्त्यांमध्ये, एका कॅटमधील प्रत्येक पत्त्यामागे दिलीपकुमारचे व दुसऱ्यामागे मधुबालाचे सुंदर चित्र छापले होते.
चार एक्क्यांवर दोघांची चित्रपटातील प्रणयप्रसंगातील चित्रे छापली होती, तर पत्र्याच्या डब्यावरही या दोघांचे एक चित्र होते. आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे या पत्त्यांमधील सर्व राजा आणि राणींच्या चेहेऱ्याच्या जागी अकबर (पृथ्वीराज कपूर) आणि जोधाबाई (दुर्गाबाई खोटे) यांचे चेहेरे छापले होते. कॅटमधील दोन जोकरवर ‘मुघल ए आझम’ असे छापले आहे.
मकरंद करंदीकर
संकलन : संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
‘मुगल ए आझम’ चित्रपट.
https://www.youtube.com/watch?v=CZDJcpJK2XY
‘मुगल ए आझम’ चित्रपटातील गाणी.
https://www.youtube.com/watch?v=6SpZEB_mIxQ
August 5, 2021
काही विनोदी सिनेमे असतात असे जे आज ही आपणास मनमुराद आंनद देतात आपल्या कुटुंबियां सोबत ‘पड़ोसन ‘हा सिनेमा बघण्याची आज ही मज्जा काही आगळीच असते. अगदी हसवत ठेवणारा सिनेमा..
January 30, 2019
भारतातील एखाद्या व्यक्तीने देशातच आणीबाणीच्या प्रसंगी पाठवलेला संदेश वातावरणातील त्या वेळच्या स्थितीमुळे कदाचित मिळणार नाही; पण अनुकूल वातावरण असलेल्या कोणत्याही ठिकाणच्या “हॅम’वर तो जाऊन पोचतोच. अतिशय तातडीचा किंवा आणीबाणीचा प्रसंग असेल, तर ज्याला संदेश मिळाला तो अन्य मार्गाने मदत पोचवण्याचा प्रयत्न करतो. दुर्घटना किंवा आपत्कालीन परिस्थितीत संदेशवहनासाठी हॅम रेडिओ हे एक प्रभावी माध्यम आहे.
April 18, 2022
श्रावण महिना लवकरच सुरु होतोय. या महिन्यात अनेकांना मद्यपान-मांसाहार वर्ज्य असतो. त्यांच्यासाठी हा खास लेख…
July 25, 2022
या आठवडय़ापासून वेलेंटाईन डे पर्यंत विविध मार्गांनी आपल्या प्रिय व्यक्तींसाठी प्रेमळ भावना व्यक्त करण्यात येतात. जस जसा वेलेंटाइन डे जवळ येतो तसा तरूणाच्या उत्साहाला उधाण येते. विशेषतः रोझ डे पासून तरूणाईकडून आपल्या प्रिय व्यक्तीसाठी विविध भेटवस्तू खरेदीसाठी बाजारात गर्दी झालेली आढळून येते.
February 7, 2022
नूडल्सचा संदर्भ हा चीनपासून लागतो. हळूहळू याला जपानी खाद्यसंस्कृतीत व ‘हाँग’च्या कृपेने तैवान खाद्यसंस्कृतीतदेखील स्थान मिळू लागले. भारतात नूडल्स हे सॉस किंवा शेजवान चटणीसोबत खाल्ले जातात.
October 6, 2021
आज फिरोजखान यांची पुण्यतिथी व आजच विनोद खन्ना यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांची जागा कधीच भरून निघू शकणार नाही. १९६८ साली चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या विनोद खन्ना यांनी १४० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांनी चित्रपटांमध्ये खलनायक आणि सहकलाकार म्हणून जास्तीत जास्त भूमिका साकारल्या होत्या. सुरुवातीच्या काही चित्रपटांमधून ते स्वतःची ओळख निर्माण करू शकले नाहीत. फिरोज खान यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘कुर्बानी’ या चित्रपटाने त्यांना प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटात फिरोज खान यांनी दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता या तिहेरी भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटात फिरोज खान यांनी दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता या तिहेरी भूमिका साकारल्या होत्या. ‘कुर्बानी’ चित्रपटानंतर विनोद खन्ना आणि फिरोज खान यांच्यातील मैत्री अधिक घट्ट झाली. विनोद खन्ना आणि फिरोज खान यांनी कुर्बानी, शंकर शंभू, दयावान यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांचे कुर्बानी, दयावान सारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड़ गाजले होते. त्या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. ते दोघे खऱ्या आय़ुष्यातही एकमेकांचे खूप चांगले मित्र होते आणि विशेष म्हणजे विनोद खन्ना यांचे निधन २७ एप्रिल २०१७ ला झाले तर फिरोज खान यांचे निधन बरोबर आठ वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे २७ एप्रिल २००९ ला झाले होते. कुर्बानी या चित्रपटातील ईश्वर का दुसरा नाम दोस्ती है हा संवाद आज त्यांच्यासाठी तंतोतत खरा ठरला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
April 28, 2017
२१ जून हा कर्क संक्रमणाचा दिवस खगोलशास्त्राप्रमाणं उन्हाळ्याची, उत्तर गोलार्धातली सुरवात मानण्यात येते. आज २१ मार्च रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ०३ वाजून ०७ मिनिटांनी सूर्य खगोलीय विषववृत्तावर येईल. यालाच "वसंत संपात" (इंग्रजीत March equinox,spring equinox, किंवा Vernal equinox) असे म्हणतात.
त्यानंतर सूर्य उत्तर गोलार्धात प्रवेश करतो. २३.५° उत्तर अक्षांशापर्यंत जाऊन दि. २१ जूनला त्याचा परत दक्षिणेकडील प्रवास सुरू होतो.(दक्षिणायन प्रारंभ) दि. २३ सप्टेंबरला तो पुन्हा विषववृत्तावर येतो , यालाच "शरद संपात" म्हणतात.इंग्रजीत Autumn equinox, September equinox असे म्हणतात.
खगोलशास्त्रानुसार उत्तर गोलार्धात उन्हाळ्याची सुरुवात २१ मार्चपासून समजण्यात येते. मात्र, मोसम विज्ञानानुसार उत्तर गोलार्धात त्याचा कालखंड जून, जुलै, ऑगस्ट असा मानण्यात येतो. त्यामुळं खगोलशास्त्रानुसार भारतात २१ जून हा ऋतुमध्ये दिवस असतो. २१ मार्च रोजी सूर्य जिथं असतो, त्या स्थितीला "वसंत संपात' आणि २१ सप्टेंबर रोजी तो जिथं असतो, त्यास "शरद संपात' म्हणतात. या दोन्ही दिवसांना विषुवदिन (इक्विनॉक्सअ) असं संबोधलं जातं.
२१ सप्टेंबर रोजी सूर्य विषुववृत्त ओलांडून दक्षिणेकडं जाऊ लागतो. २१ डिसेंबर या दिवशी तो त्याच्या दक्षिणतम मर्यादेपर्यंत म्हणजे मकरवृत्तावर येतो आणि त्यानंतर त्याचं पुन्हा एकदा उत्तरेकडं भ्रमण चालू होतं (उत्तरायण). भारतात या चक्राची विभागणी वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर अशा सहा ऋतूंत केलेली आहे.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
March 21, 2022
२०१० सालच्या फिफा विश्वचषकाच्या काळात त्यानं भलतीच झेप घेतली. २९४० ट्विट्स प्रति सेकंद इतक्या गतीनं लिहिले जात होते. त्याच्या आदल्या वर्षी गायक-नर्तक मायकेल जॅक्सन याचं गूढ निधन झालं. त्या वेळी मायकेल जॅक्सन हे दोन शब्द लिहीपर्यंत ट्विटरचा सव्र्हर संगणक मोडून पडत होता. एका तासात एक लाख इतक्या गतीनं ट्विट्स त्या वेळी लिहिले गेले.
March 22, 2022
अनेक वर्षा पासून ‘बॉम्बे’हे शहराचे नाव नसावे, ‘मुंबई’असावे, अशी रास्त भूमिका शिवसेनेने घेतली होती आणि ४ मे १९९५ रोजी त्या वेळच्या युती सरकारने अधिकृतपणे ‘मुंबई’हे नाव अस्तित्वात आणले.
May 4, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti