एकाद्या दिवशी घडलेल्या विविध घटना, जगभरात साजरे होणारे वेववेगळे दिवस, यांची माहिती देणारा विभाग.. अजून बरंच काही येतेय इथे
मराठी भाषा ही आपल्यासाठी फक्त एक भाषा नसून ममतेचे वासल्याचे बोल आहेत. कुठल्याही शस्त्राची गरज मराठी शब्दांना लागत नाही . कारण मार्दव, ममत्व हे या मराठी भाषेच्या ठाई कायमच वसलेले असते. दरवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस ” मराठी भाषागौरव दिन” म्हणून साजरा केला जातो.
February 27, 2024
माणसाने एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. माणूस निसर्गात केवळ एक ग्राहक आहे, उत्पादक नाही. अन्नासाठी, प्राणवायूसाठी तो निसर्गावर पूर्णपणे अवलंबून आहे.
October 1, 2021
मंडळी आज ३ ऑगस्ट आणि आज कलिंगड दिन परदेशात साजरा केला जातो. चला तर थोडासा ह्याचा इतिहास जाणून घेऊ.
August 3, 2020
नोकरी करताना वेळ नाही हे पालुपद फक्त स्वत:च्या संदर्भात, बाकी इतरांसाठी धावतपळत ती सगळी कामं करतच असते. एवढंच कशाला, नोकरी करून निवृत्त झाल्यावरसुद्धा ती घरातली सारी कामं स्वत:वर ओढून घेते. इतकी वर्ष माझं तसं घराकडे दुर्लक्षच झालं म्हणत पोळ्या करणा:या बाईला सुटी देते. आपण आहे ना काम करायला, मग कशाला पैसे खर्च करा म्हणत कामच करते. स्वत:वर पैसे खर्च करण्याआधी दहादा विचार करते. स्वत:च्या ‘फिटनेस’साठी तर एक पैसा खर्च करायलाही तयार होत नाही. ती विचार करते, त्यापेक्षा मी घरात थोडं जास्त काम करेन. भाजी आणायला गेल्यावर थोडं जास्त चालायला जाईन. पण हे एवढंच करून ती फिट राहू शकत नाही. त्यासाठी रोज वेगळा वेळ काढून व्यायामच करायला हवा. आणि स्वत:कडे अजिबात दुर्लक्ष न करता स्वत:साठी वेळ काढायलाच हवा.
May 28, 2022
युद्ध सुरू असताना सूर्यास्त झाल्यावर रणांगणावरील सैनिक आपापल्या छावण्यांमध्ये परत जात. यावेळी एक सांगीतिक समारंभ आयोजित केला जाई. त्याला बीटिंग द रिट्रीट म्हणत. हाच सोहळा प्रजासत्ताक दिनाच्या समारोपप्रसंगी रायसीना हिल्सवर होतो.
January 29, 2022
रेबीजग्रस्त कुत्रा, मांजर चावल्यानंतर सर्वसाधारणपणे २० ते ३० दिवसात रोगाची लक्षणे दिसतात. परंतू काही वेळा यापेक्षाही अधिक काळ म्हणजे काही महिने ते वर्ष लागतात.
September 28, 2021
८ जून १९४८ रोजी एअर इंडियाने भारत इंग्लंड हवाई सेवा सुरू केली. एअर इंडिया इंटरनॅशनल लिमिटेडने मुंबई-लंडन द्वारा कैरो व जिनीव्हा अशा आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीस प्रारंभ केला. त्यावेळी एअर इंडिया जवळ कॉन्स्टेलेशन ७४९ ह्या जातीची तीन विमाने होती.
June 8, 2021
स्वामी विवेकानंद म्हणतात- प्रार्थनेपेक्षा खेळ तुम्हाला देवाच्या जास्त जवळ घेऊन जाऊ शकतो. कारण प्रार्थनेमध्ये तुमचा संपूर्ण सहभाग असेलच असे नाही परंतु खेळात तो असतोच. वरील संदर्भ लक्षात घेता येथे नमूद करू वाटते की व्यक्तिमत्व विकासामध्ये बुद्धिबळाचा सिंहाचा वाटा आहे. आणि त्यामुळेच व्यक्तिमत्व विकास करण्याकरिता बुद्धिबळ हा खेळ आत्मसात करावा, जोपासावा, व्यासंग धरावा व त्याचे अनुसरण करावे.
April 4, 2022
इंग्लंडचा राजा चार्ल्स पहिला याच्या जेवणानंतरच्या डेझर्ट डिशमध्ये आइसक्रीमचा समावेश हमखास असायचा. पण तो या पदार्थाबाबतीत इतका दक्ष होता की या ‘फ्रोजन स्नो’ची माहिती कुणालाही कळू नये यासाठी त्याने आपल्या शेफला ही पाककृती लपवून ठेवण्याकरता आयुष्यभर पेन्शनची सोय केली होती असं म्हणतात.
July 19, 2022
१४ डिसेंबर १९११ रोजी रॉल्ड अमुंडसेन हा नॉर्वे देशाचा नागरीक प्रथम अंटार्क्टिकावर पोहोचला. त्याचे पथक सुखरुप परत आले. १८ जानेवारी १९१२ ला रॉबर्ट स्कॉटही दक्षिण ध्रुवावर जाऊन पोचला. परंतु परत येताना तो व त्याचे लोक मृत्यू पावले.
December 14, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti