एकाद्या दिवशी घडलेल्या विविध घटना, जगभरात साजरे होणारे वेववेगळे दिवस, यांची माहिती देणारा विभाग.. अजून बरंच काही येतेय इथे
जागतिक टेलरिंग दिवस हा शिवणयंत्राचे संशोधक अमेरिकन इंजिनिअर सर विल्यम इलिआस होव यांच्या स्मृती प्रीत्यर्थ २८ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.
February 28, 2025
मेघदूत या महाकवी कालिदासाच्या अजरामर कलाकृतीचा जन्म झाला तो रामगिरीवर अर्थात सध्याचं रामटेक. मेघदूत हे दूतकाव्य तसेच विरह काव्यसुद्धा. या मेघदूत काव्याचा नायक यक्ष कुबेराच्या शापामुळे आपल्या प्रिय पत्नीपासून दूर एकांतवासात एका वर्षासाठी रामगिरीवर राहत असतो. पत्नीचा विरह त्याला सहन होत नाही. अशातच त्याला आषाढाच्या पहिल्या दिवशी आकाशात मेघ दिसतो. आपल्या पत्नीपर्यंत आपला खुशालीचा निरोप देऊ शकेल, पोहोचवू शकेल अशा विचाराने मेघाला दूत बनवायचं यक्ष ठरवतो.
July 11, 2021
वॉल्ट डिस्ने घरात व ऑफिसमध्ये अनेक ठिकाणी पेन्सिली मुद्दाम ठेवे. कोठेही व केव्हाही कल्पना सुचली की भिंतीवर लगेच तो लिहून ठेवी. एडिसन स्वत:साठी खास लांबीने लहान असलेल्या पेन्सिली बनवून घेई. मोठय़ा पेन्सिली कोटाच्या खिशाच्या शिलाईत अडकतात अशी तक्रार करे. हेमिंग्वे लेखनाचा मूड बनवण्यासाठी पेन्सिली तासणे सुरू करे. रोज दोन पेन्सिली तरी लिहून संपवण्याचा त्याचा प्रयत्न असे.
March 30, 2022
३ व ४ डिसेंबरच्या मध्यरात्री भारतीय नौदलाने केलेल्या या हल्ल्याने पाकिस्तानचे कंबरडे मोडले आणि युद्धाचे पारडे भारताच्या दिशेने झुकले. त्यानंतर दहा दिवसांतच पाकिस्तानने शरणागती पत्करली.
December 4, 2021
दि. १ एप्रिल १९५५ ला रामनवमीच्या मुहूर्तावर गीतरामायणातील पहिले गीत सादर झाले.
April 15, 2017
जगातली पहिली सेल्फी घेतला गेला होता तो १८३९ साली. अर्थात त्यावेळी सेल्फी हा शब्द रूढ झाला नव्हता. स्मार्टफोनचा जन्म होण्यापूर्वीही हातात कॅमेरा घेऊन स्वतःची छबी टिपण्याचा प्रयत्न अनेकांनी केला होता. उपलब्ध माहिती नुसार जगातील पहिली सेल्फी १८३९ घेतली गेला. फिलाडेल्फिया येथे एका दिव्यांच्या दुकानाबाहेर रॉबर्ट कॉर्नेलिअस यांनी ही सेल्फी घेतली होती.
June 22, 2021
१९ वर्षे हाऊसफुल्ल मनोरंजन करणारे मराठी रंगभूमीवरील नाटक "सही रे सही"
केदार शिंदे लिखित-दिग्दर्शित 'सही रे सही' नाटकाचा पहिला प्रयोग १५ ऑगस्ट २००२ ला झाला होता. अनेक विक्रम रचणाऱ्या या नाटकाची नोंद मराठी रंगभूमीवरील एक सोनेरी पान म्हणून झाली आहे. या नाटकाचे एका वर्षात ५६५ प्रयोग झाले होते. त्यासाठी त्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाली होती.
मधल्या काळात ते नाटक रंगभूमीपासून दूर होतं. पण, 'भरत जाधव एंटरटेनमेंट' च्या वतीनं पुन्हा सही रे सही'चे प्रयोग दणक्यात सुरू झाले. रंगमंचावर आपल्या डोळ्यांसमोर एकाच वेळी चार ठिकाणी भरत जाधव दाखवण्याची किमया नाटकानं केली. भरत जाधव या नाटकामध्ये मदन सुखात्मे, रंगा ट्रक ड्रायव्हर, गलगले आणि दामू अशा चार व्यक्तिरेखा साकारतात. या नाटकामुळे भरत जाधव हे नाव महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात पोहोचलं. ‘सही रे सही’ या नाटकाचे ‘अमे लई गया, तमे रही गया’ या नावाने गुजराती भाषेत प्रयोग झाले. त्यात शर्मन जोशीने प्रमुख भूमिका केली होती.
गुजराती ‘सही रे सही’ नाटकाचे २० महिन्यांत ३५० प्रयोग झाले होते. एखाद्या नाटकाचे इतके प्रयोग होणे, हे गुजराती रंगभूमीवर प्रथम घडले होते. ‘सही रे सही’ नाटकाचे ‘हम ले गये, तुम रह गये’ या नावाने हिंदीत भाषांतर झाले. हिंदी नाटकात जावेद जाफरीने प्रमुख भूमिका साकारली होती.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
August 15, 2021
विजयआनंद उर्फ गोल्डी यांचा ज्वेलथीफ हा सर्वकालीन सर्वोत्तम रहस्यपट २७ ऑक्टोबर १९६७ रोजी प्रदर्शित झाला. देव आनंद यांच्या कारकिर्दीतील हा सर्वोत्तम रहस्यरंजक चित्रपट म्हणून ओळखला जातो. या चित्रपटाची जादू आजही कायम आहे.
November 4, 2022
लालबहादूर शास्त्री व पाकिस्तानचे राष्ट्रपती अयुबखान यांच्यामध्ये सोव्हिएट महामंत्री कोसिजिन यांच्या मध्यस्थीने ४ जानेवारी १९६६ पासून वाटाघाटी होऊन १० जानेवारीस नऊ कलमी करारावर उभय नेत्यांनी सह्या केल्या.
January 10, 2022
नाट्याचार्य खाडिलकर यांनी ७ मार्च १९२३ रोजी दैनिक ‘नवाकाळ’ ची स्थापना केली. त्यांनी ‘नवाकाळ’ धडाडीने यशस्वी केला. ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर नवाकाळमधील अग्रलेख आणि टिका टिप्पणी याबद्दल राजद्रोहाचा खटला ९ फेब्रुवारी १९२९ रोजी भरला. २७ मार्च रोजी त्यांना एक वर्ष साधी कैद व दोन हजार रुपये दंडाची सजा झाली. पण तो ब्रिटिशांचा तुरुंग होता. त्यांनी जातानाच मनोमन ठरविले आणि त्यानुसार ‘नवाकाळ’ चे संपादकपद सोडले.
March 7, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti