(User Level: User is not logged in.)

दिनविशेष

एकाद्या दिवशी घडलेल्या विविध घटना, जगभरात साजरे होणारे वेववेगळे दिवस, यांची माहिती देणारा विभाग.. अजून बरंच काही येतेय इ‌थे

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • भारतीय अक्षय ऊर्जा दिन

    २० ऑगस्ट ! १६ वर्षांपूर्वी म्हणजेच २००४ साली भारत नवीन व नूतनीकरणयोग्य ऊर्जा स्रोत मंत्रालय (The Indian Ministry For New & Renewable Sources) ह्यांनी ह्या दिवसाची स्थापना केली.

      August 20, 2020


  • मदर इंडिया’ हिंदी चित्रपटसृष्टीतील गाजलेला चित्रपट

    १९२७ साली एक अमेरिकन लेखकाने याच नावाचे एक वादग्रस्त पुस्तक लिहून भारतीय स्त्री यांच्या पुराणातील विधानांचा आधार घेऊन, स्त्री प्रतिमेला बदनाम करण्याची उठाठेव केली होती. त्यावर उत्तर देण्यासाठी, भारतीय स्त्री जशी सोशिक तशीच कशी धाडसी व कणखर असू शकते याचा प्रत्यय आणून देण्यासाठी त्याने आपल्या औरतच्या पुनरावृत्तीला ‘मदर इंडिया’ असे शीर्षक दिले.

      October 25, 2021


  • विश्वकर्मा जयंती

    माघ शुद्ध त्रयोदशीला विश्वकर्मा जयंती साजरी केली जाते. विश्वकर्मा यांची ओळख देवांचे आर्किटेक्ट म्हणजे वास्तूकला तज्ज्ञ म्हणून केली जाते. या दिनी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. निर्मिती, बांधकाम, शिल्पकला, सोनेकाम करणाऱ्या व्यक्तींसाठी विश्वकर्मा जयंती महत्त्वाची मानली जाते. या दिवशी विश्वकर्मांची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे विश्वकर्मा जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

    ब्रह्मदेवाच्या दक्षिण वक्ष भागातून विश्वकर्मा उत्पन्न झाला असे महाभारतात म्हटले आहे. सृष्टीच्या प्रारंभी केवळ हाच अस्तित्वात होता. प्रारंभी विश्वकर्मा हा सौरदेवतेची उपाधी म्हणून मानला जात होता, पण नंतरच्या काळात तो समस्त प्राणीसृष्टीचा जनक मानला गेला. एक वैदिक देवता असाही उल्लेख आढळतो. ऋग्वेदाच्या एका सुक्तात त्याला पृथ्वी, जल व सर्व प्राणी यांचा निर्माता आणि सर्वश्रेष्ठ देव म्हटले आहे. सर्व देवांचे नामकरणही यानेच केले. हा सर्वद्रष्टा असून, याला असंख्य मुखे, नेत्र, भुजा, पाय इत्यादी अवयव आणि पंखही होते, असे रूपवर्णन पौराणिक साहित्यात केले आहे. याला सर्वद्रष्टा प्रजापती / विधाता प्रजापती म्हटले आहे.

    पुराणे व महाभारत यात विश्वकम्र्याला देवांचा महान शिल्पशास्त्रज्ञ मानले आहे. याने इंद्रासाठी इंद्रलोक निर्माण केला. सुतलनामक पाताळलोक यानेच निर्माण केला. श्रीकृष्णासाठी द्वारका नगरी, वृंदावन, राक्षसांसाठी लंका तसेच पांडवांसाठी हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थ ही नगरे यानेच निर्माण केली. एक विख्यात शिल्पशास्त्रकार या नात्याने गरूड भवनाची निर्मितीदेखील विश्वकर्मा यानेच केली. विश्वकर्मा वास्तुशास्त्र हा ग्रंथ विश्वकर्मा यांच्या नावावर आहे.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

      September 17, 2021


  • छोटी सी बात चित्रपट

    अमोल पालेकर, विद्या सिन्हा यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट अमोल पालेकर यांच्या चित्रपट कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरला. चित्रपटाचा नायक हा लहानपणापासून आपल्या आई-वडिलांच्या छायेत वाढलेला असतो.

      March 4, 2025


  • एक रूपयाच्या नोटेची एकशे चार वर्षे

    भारतावर इंग्रजांचे राज्य असताना त्यांनी देशात प्रथम १८६१ मध्ये नोटा छापण्यास सुरुवात केली. पण ब्रिटीश सरकारने सर्वात प्रथम एक रूपयाची नोट ३० नोव्हेंबर १९१७ मध्ये चलनात आणली. ही नोट इंग्लंडमध्ये छापण्यात आली होती. या नोटेवर पाचव्या जॉर्जचे छायाचित्र होते.

      November 30, 2021


  • माघी गणेश जयंती

    गणपतीचे एकंदरीत तीन अवतार मानण्यात येतात. या तिन्ही अवतारांचे जन्मदिवस वेगवेगळे आहेत. पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस, दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा श्रीगणेश जयंतीचा दिवस !

      February 13, 2024


  • भारतीय आयकर दिवस

    जेम्स विल्सन ह्या भारताच्या पहिल्या ब्रिटीश अर्थ अधिकाऱ्याने भारतीयांवर इन्कम टॅक्स आकारण्यास सुरवात केली म्हणून आजच्या दिवशी आयकर (इन्कम टॅक्स) दिवस साजरा करण्यात येतो.

      July 24, 2021


  • जागतिक खवलेमांजर दिवस

    भारतीय खवले मांजराची लांबी (डोके व धड) ६०-७५ सेंटीमीटर असते. शेपूट ४५ सेंटीमीटर लांब असते. डोके लहान, तोंड लांबट व पुढे निमुळते असते. डोळे बारीक व कान फार लहान असतात. भारतीय खवले मांजर साधारणत: ८ ते ३५ किलोपर्यंत वाढते. त्याच्या अंगावर असलेले खवले हे किराटीन नामक द्रव्यापासून तयार होतात.

      February 19, 2022


  • केंद्रीय कस्टम आणि उत्पादन शुल्क दिवस

    २४ फेब्रुवारी १९४४ रोजी केंद्रीय उत्पादन शुल्क व नमक कायदा लागू केल्यामुळे सेंट्रल एक्साइज (केंद्रीय कस्टम आणि उत्पादन शुल्क) (Central Board of Excise and Custom – CBEC) दिवस २४ फेब्रुवारीला साजरा केला जातो.

      March 1, 2024


  • स्लाइस्ड ब्रेडची बाजारात प्रथम विक्री

    भारतात सुफी संगीतकार आणि कवी आमिर खुसरो यांच्या लेखनात पहिल्यांदा ब्रेडचा उल्लेख आढळला. मुघलांच्या राज्य काळात ब्रेडचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. पण हा ब्रेड मिडल ईस्ट म्हणजे इजिप्तवरुन आला होता. त्यानंतर पोर्तुगीज आणि इंग्रज आल्यावर पुन्हा ब्रेडमधे फरक पडला. यासाठी आपण गोव्यातल्या ब्रेडची तुलना मुंबईतल्या ब्रेडशी केली पाहिजे. कारण गोव्यातल्या ब्रेडवर पोर्तुगीज पद्धतीच्या ब्रेडचा प्रभाव आहे तर मुंबईच्या ब्रेडवर ब्रिटीश ब्रेडचा.

      July 7, 2022