गुरु म्हटल्यावर आपल्याला दत्तगुरु सर्वात आधी स्मरण होतात. दत्तगुरु म्हणजे साक्षात दत्तरुपी हरि ॐ ब्रह्म… काय आहे या दत्तगुरुंची कथा ….कशी रचना साकारली या त्रिगुणात्मक त्रैमुर्ती दत्तगुरुंच्या अवताराची… हरि ॐ ब्रह्मांच्या जन्माची…. पाहुया कथा श्री ॠषीरुपी दत्तगुरुंची…
February 27, 2020
घडवलेली रचना, तयार केलेली आकृती, काढलेला आराखडा …. म्हणजे कल्पना ….
November 5, 2019
संघर्ष हा धगधगत्या अग्नीप्रमाणे असतो. त्यातून पोळून निघालेले व्यक्तिमत्व हे सदैव इतरांसाठी आदर्श ठरते. जीवनामध्ये आलेला प्रत्येक संघर्ष एक नवीन अनुभव देऊन जातो आणि अनुभवातून मिळते ती सुंदर जीवन जगण्याची कला..
December 3, 2020
शरिरामध्ये अस्तित्वात असणार्या प्राणशक्ति वर केलेली साधना म्हणजे प्राणभक्ती…. प्राणभक्ती ध्यान केल्याने शरिराची रोगप्रतिकार क्षमता वाढते आणि आपल्या शरिराला आजारांपासुन मुक्ती मिळते.
December 16, 2019
स्मरण म्हणजे आठवण…एखादया गोष्टीचे चिन्तन…..बालपणापासुन खुप अश्या आठवणी आपण मनात जपलेल्या असतात. लहानाचे मोठे होई पर्यंत लहान सहान गोष्टी समोर येतात आणि खुप सार्या गोष्टी स्मरण करुन देतात.
October 17, 2019
आपल्या नेहमीच्या जीवन प्रवासात अश्या बर्याचश्या घट्ना घड्तात ज्यामुळे आपले विचार निर्माण होतात तर बहुतेकदा आपले विचार अति होऊन एका ठरविक पातळीचे उल्लंघन होते आणि त्या विचारांमधुन स्थिती निर्माण होते. अश्या विचारांवर चर्चा, चर्चेतुन विषय, विषयांचा अभ्यास, अभ्यासातुन ग्रहण आणि जे ग्रहण केले ते ज्ञान म्हणजे “निरंजन”!
September 28, 2019

एकाग्रतेने मनाची स्थिरता वाढते आणि स्थिरता वाढल्यामुळे मन एकचित्त होउन हाती घेतलेल्या कार्यामध्ये आपले आपसुकच चिंतन वाढते आणि जेव्हा चिंतन वाढते तेव्हा नैसर्गिकरित्या आपाल्याला खुप सार्या वेगवेगळ्या कल्पना आपोआपच सुचतात. ज्यामुळे कामाची गती वाढते, त्या कामामध्ये कोणतीही अडचण येत नाही. आणि हाती घेतलेले काम खुप सुंदर पद्धतीने पार पाडले जाते.
ही जी एकाग्रता आहे ती प्रत्ये़कामध्ये आहे, फक्त फरक हा इतकाच कि, आपण ती योग्य मार्गावर उपयोगात आणत नाही. एकाग्रतेने केलेले प्रत्येक कार्य हे खुप सुंदर पद्धतीने पार पाडले जाते. कित्येकदा आपण एकाच वेळी अनेक कामे करण्याचा प्रयत्न करतो परिणामी त्यातले एकही कार्य सुरळीत पार पाडले जात नाही आणि निकाल मात्र शुन्य तर इथे आहे आपल्यामधल्या एकाग्रतेचा अभाव..... कारण जेव्हा आपण एकाच वेळी खुप सार्या जबाबदार्या स्वत:वर घेतो तेव्हा आपण त्यात तितक्याच क्रियेंमध्ये वाटले जातो. आणि तितक्याच विचारांनी कार्यरत राहतो. अशा वेळी जर आपले लक्ष एखाद्या वेगळ्याच विचारांनी भरले गेले किंवा आपले लक्ष भटकले गेले तर मात्र आपण आपल्या क्रियेमध्ये परिपुर्ण एकाग्रता साधु शकत नाही. त्यामुळे आपण आपले संपुर्ण चित्त एका ठिकाणी लावु शकत नाही. परिणामी कार्य विस्कळीत होते.
"चित्त थार्यावर नाहिये" असं आपण आपल्या नेहमीच्या दैन्ंदिन चर्चेत अनेकदा ऐकतो, कधी-कधी काम अपुर्ण राहिल्यावर तर कधी एखाद्याला दिलेली जबाबदारी त्याने विस्कळीतपणे पार पाडल्यावर. "चित्त थार्यावर नसणे" म्हणजेच "कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित नसणे", एकाग्रता नसणे...
अनेकदा आपण अनुभवलं असेलच की कित्येकजण खुप घाई करुन काम करतात फक्त लवकर काम आटोपण्यासाठी, पण तसे होत नाही कारण घाई करुन आपण एकाग्रता साधु शकत नाही. याउलट आपण ते काम कितीतरी पटीने वाढवुन ठेवतो. कारण घाईघाई ने अचुकता साधता येत नाही, जितका वेग महत्वाचा आहे त्याहुनही कितीतरी पटींनी महत्वाची आहे ती आपण केलेल्या कार्यामधली अचुकता.... आणि ही अचुकता साधता येते ती फक्त एकाग्रतेने.....अजुन एक विषय म्हणजे सध्याच्या काळातील लोकांचे विचार हे जितके गतीमय झाले आहेत तितकाच तो अस्थिर ही झाला आहे आणि त्यामुळेच मनाची चंचलता खुपच वाढली आहे. याच चंचलतेचा परिणाम आज नातेसंबधांवर सुदधा दिसुन येत आहे. कारण सतत प्रत्येकाची आवड निवड ही त्यांच्या बदलत्या विचारांप्रमाणे बदलत चालली आहे. इतकेच नाही तर आपण स्वतः ही स्वतःपासुन दुरावले गेले आहोत. कधीकधी कित्येकदा आपण इतरांची विनाकारण चर्चा करत बसतो काहिही कारण नसताना. तर कधी कधी इतरांशी तुलना करुन स्वतःहुन स्वतःचे विचार वाढवुन घेतो. आज जी एकाग्रता आपण इतरांच्या चर्चेमध्ये साधुन बसलो आहोत. तिच जर आपण आपल्या स्वतःवर साधली, स्वतःच्या श्वासांवर साधली तर नक्कीच चित्त केंद्रित होईल, लक्ष्य साधता येईल, विचार कमी होतील, वाईट स्वभाव बदलेल, वाईट सवयी बदलतील, जीवनाचे ध्येय कळेल, जीवनाचे व्यवस्थापन कळेल, वेळेचे महत्व कळेल. कार्य अर्थपुर्ण होतील. खुप काही सुंदर बदल घडतील. म्ह्णजेच कुठेतरी आपल्याकडे एकाग्रता ही जाग्रुत आहे पण ती कुठे उपयोगात आणली पाहीजे याचं वळण मात्र खुपच चुकतय. याची दिशा चुकतेय.
योग्य ती दिशा निवडण्यासाठीच आपल्याला योग्य अशा मार्गदर्शकांची जीवनामध्ये अत्यंत गरज असते. योग्य तो मार्ग आणि योग्य ती दिशा सुचवणारी व्यक्ती ही फक्त ध्यानगुरु असते. अर्थातच ही व्यक्ती संपुर्ण एकाग्र चित्त असणारी असते. एकाग्रतेवर विजय मिळवलेली असते. संपुर्ण स्थिर असते. अशी संपुर्ण स्थिर, एकाग्र चित्त असणारी व्यक्तीच चंचलतेला अंकुश लावु शकते कारण स्थिरतेमध्येच क्षमता आहे अस्थिरतेवर मात करण्याची जशी प्रकाशामध्ये क्षमता आहे अंधकाराला दुर करणाची..............अशी मार्गदर्शक व्यक्ती म्हणजेच ध्यानगुरु, एकाग्रतेवर ध्यान असणारे गुरु...
गुरु द्रोणाचार्यांच्या नजरेत अर्जुन हे श्रेष्ठ धनुर्धारी होते हे फक्त अर्जुनांच्या एकाग्रतेमुळेच. आपल्या शिष्यांच्या धनुर्विद्येचे परिक्षण करताना त्यांनी एकाग्रता पाहिली ती फक्त अर्जुनाकडे. कारण अर्जुनाने एकाग्रतेने लक्ष्य साधले होते. तसेच एकलव्य ही श्रेष्ठ धनुर्धर होते ज्यांनी न पाहता फक्त ध्वनीवर एकाग्रता ध्यान साधले होते. त्यांनी भुंकणार्या श्वानाचा आवाज त्याला इजा न होउ देता भुंकणे बंद केले होते. यावरुन आपल्याला स्पष्ट झालेच असेल कि एकाग्रता हि किती महत्वाची आहे. जर आपण नेहमी २० ते २५ मिनिटे एकाग्रता ध्यान केले तर जीवनामध्ये अकल्पनीय असे बदल नक्कीच घडुन येतील. जीवनामध्ये असे बदल घडवुन आणण्यासाठी एकाग्रता ध्यान खुप महत्वाचे आहे.
- स्वाती पवार
October 13, 2019
गुंजन दोन मनांचे म्हणजे, आपले मन एखाद्याच्या मनाशी गुणगुणणे, असा इथे अर्थ नव्हे….. तर आपले एक मन आपल्याच दुसर्या मनाची परीभाषा ओळखणे, असा इथे अर्थ आहे.
August 6, 2020
गुरु म्हणजे जीवनाचे मांगल्य, जीवनाचे कल्याण, साक्षात जीवनाचे व्यवस्थापन, जीवनाला दिलेला अर्थ, गुरुविना जीवन म्हणजे दिशेविणा मार्ग , जीवनामध्ये गुरु असणं हे खुप महत्त्वाचे आहे. जन्मापासुन ते मॄत्युपर्यंत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर गुरु हे लागतातच. ज्ञान देणं हे गुरुंचे परम कर्तव्य…आणि या कर्तव्याला धारण करणारी व्यक्ती म्हणजे गुरु…
July 5, 2020
एका राज्यामध्ये एक सुप्रसिद्ध नामवंत मूर्तिकार राहत होता. त्याचे नाव होते. इंद्रजीत… मूर्ती घडविण्याचे अप्रतिम कौशल्य त्याच्याजवळ होते. तो अगदी हुबेहूब आणि जिवंत मुर्त्या घडवित असे. त्याच्या कलाकौशल्याला परदेशातही मागणी होती. राज्यात कित्येकदा त्याला त्याच्या या कलेबद्दल पुरस्कार मिळाला होता.
January 14, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti