ब्लँक चेक

नाव-तारीख घालून माझ्या सहीचा चेक तिला दिला,

तेव्हा रकमेची मोकळी चौकट पाहून तिला झालेला

विस्मय सारायला मी म्हंटलं , "शाई संपली,

तू घालून घेशील रक्कम...?!"

मान झुकवत उमललेले मंद स्मित

लपवताना ती "हो" म्हणाली खरी , पण ते पेन

पारदर्शक होतं आणि शाई अर्ध्याहून जरा जास्तंच....!

आठवड्याभरात रुपयाची डेबिट एन्ट्री....तिच्या नावाने....

माझ्या रुपयातले लाखमोलाचे सोळा सच्चे आणे वेचून गेली...

एकाच्या उजवीकडे पाच शून्य घालताना

बहुधा तिच्याही पेनातली शाई संपली असावी.....!!

- रोहित



नाव-तारीख घालून माझ्या सहीचा चेक तिला दिला,

तेव्हा रकमेची मोकळी चौकट पाहून तिला झालेला

विस्मय सारायला मी म्हंटलं , “शाई संपली,

तू घालून घेशील रक्कम…?!”

मान झुकवत उमललेले मंद स्मित

लपवताना ती “हो” म्हणाली खरी , पण ते पेन

पारदर्शक होतं आणि शाई अर्ध्याहून जरा जास्तंच….!

आठवड्याभरात रुपयाची डेबिट एन्ट्री….तिच्या नावाने….

माझ्या रुपयातले लाखमोलाचे सोळा सच्चे आणे वेचून गेली…

एकाच्या उजवीकडे पाच शून्य घालताना

बहुधा तिच्याही पेनातली शाई संपली असावी…..!!

– रोहित

Author