अरडी ग बाई, परडी
रस्त्यावरती गर्दी
ही गर्दी कशाची
ही गर्दी सेलची
चला चला मैत्रिणींनो सेलला
स्वस्त्यात कपडे आणायला
स्वस्त्यात साड्या आणायला
सुधाताई मंदाताई आणायला
दुकानदाराची चलाखी
८०० ची साडी ५०० ला
५०० चा ड्रेस ३०० ला
चला चला मैत्रिणींनो सेलला
स्वस्त्यात कपडे आणायला
स्वस्त्यात साड्या आणल्या
घरी नेऊन पाहिल्या
ड्रेसचा रंग झला फिका
वाया गेला सारा पैका
साडीला होते भोक
पैसे गेले रोख
आता लागली तळमळ
उपाय नाही तीळभर
बैल गेला झोपा केला
पुन्हा जाऊ नका सेलला
Author
Post Views: 11