भावनांचा गहिवर

विसावता क्षितिजी तेजोगोल
अस्ताचलावर केशररंगी अंबर

मनभावनांची उलघाल अंतरी
सावळबाधी सांजाळ वेदिवर....

मंदमंद धुसर ती कातरवेळा
जीवनसंध्येचा हा भास सुंदर

घोंगावते आठवांचे मोहोळ
उभा सामोरी तो मुरलीधर...

अंतर्यामी आज घुमते पावरी
लोचनी तरळतो श्यामलसुंदर

आज आठविती मित्र सगेसोयरे
उचंबळतो भावनांचा गहिवर...
*********

-- वि.ग.सातपुते (भावकवी)

(9766544908)

रचना क्र. ३२८

११/१२/२०२२



विसावता क्षितिजी तेजोगोल
अस्ताचलावर केशररंगी अंबर

मनभावनांची उलघाल अंतरी
सावळबाधी सांजाळ वेदिवर….

मंदमंद धुसर ती कातरवेळा
जीवनसंध्येचा हा भास सुंदर

घोंगावते आठवांचे मोहोळ
उभा सामोरी तो मुरलीधर…

अंतर्यामी आज घुमते पावरी
लोचनी तरळतो श्यामलसुंदर

आज आठविती मित्र सगेसोयरे
उचंबळतो भावनांचा गहिवर…
*********

— वि.ग.सातपुते (भावकवी)

(9766544908)

रचना क्र. ३२८

११/१२/२०२२

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →