भाताचे रोप

चिमणे इवलाले बीज
रम्य त्यात होती शेज.
दीड वितीचे कुणि रोप
घेत तिथे होते झोप ।।१॥।

ऊन म्हणाले, 'ऊठ गड्या.'
पाउस वदला, 'मार उड्या,
जगात ये रे ह्या उघड्या.
करी जळाच्या पायघड्या.' ।॥॥२॥।

वायु बोलला, 'ऊठ कि रे,
माझ्याशी धर फेर बरे.
हसले जर आम्हा कोणी

दावु वाकुल्या नाचोनी.' ॥३॥।
भूमि म्हणाली, 'चल बाळा,
वाजव पाण्याचा वाळा,
अंगी हिरवी सोनसळा
घालुनि ही दावी सकळा.' ।॥॥४॥।

झोप झटकुनी ते उठले,
नंदबाळ जणु अवतरले.

पाउस, वारा, ऊन तसे
जमले भवती गोप कसे. ॥५॥

अदभुत ह्याचा खेळ अहा
जरा येउनी पहा, पहा.
उगवे, चमके, पहा तरी
मोरपिसांचा तुरा शिरी. ।॥६॥



चिमणे इवलाले बीज
रम्य त्यात होती शेज.
दीड वितीचे कुणि रोप
घेत तिथे होते झोप ।।१॥।

ऊन म्हणाले, ‘ऊठ गड्या.’
पाउस वदला, ‘मार उड्या,
जगात ये रे ह्या उघड्या.
करी जळाच्या पायघड्या.’ ।॥॥२॥।

वायु बोलला, ‘ऊठ कि रे,
माझ्याशी धर फेर बरे.
हसले जर आम्हा कोणी

दावु वाकुल्या नाचोनी.’ ॥३॥।
भूमि म्हणाली, ‘चल बाळा,
वाजव पाण्याचा वाळा,
अंगी हिरवी सोनसळा
घालुनि ही दावी सकळा.’ ।॥॥४॥।

झोप झटकुनी ते उठले,
नंदबाळ जणु अवतरले.

पाउस, वारा, ऊन तसे
जमले भवती गोप कसे. ॥५॥

अदभुत ह्याचा खेळ अहा
जरा येउनी पहा, पहा.
उगवे, चमके, पहा तरी
मोरपिसांचा तुरा शिरी. ।॥६॥

Authors