भाज्या मिश्रित टोमॅटो सूप

साहित्य: ६-७ पिकलेले टोमॅटो, १ कांदा, वेळ: : २० मिनिटे १ गाजर, २ पातीचे कांदे, २ लसूण पाकळ्या, ४ मिरी दाणे ठेचून, ३ टे. स्पून मैदा, १ कप क्रीम, १ टी स्पून अमूलबटर, ५ कप व्हेज स्टॉक.

कृती: टोमॅटो, कांदा, गाजर, पातीचा कांदा व पात सर्व धुऊन बारीक चिरावे. जाड बुडाच्या पातेल्यात लोणी वितळवावे. नंतर त्यात चिरलेला कांदा, गाजर, पातीचा कांदा घालून मऊ होईपर्यंत परतावे. जरूर वाटल्यास थोडे पाणी घालावे. जरासे कोरडे झाल्यावर मैदा घालावा व परतावे. त्यावर व्हेज स्टॉक, लसूण, मिरीदाणे, मीठ घालावे. शेवटी टोमॅटो घालावे. झाकण ठेवून चांगले शिजवावे. गार झाल्यावर मिक्सरमधून एकजीव करावे व गाळावे. दाट वाटल्यास थोडे पाणी घालून उकळवावे. हे मिश्रण उकळल्यावर गॅस बंद करा. सूप बाऊलमध्ये वाढून त्यावर थोडे क्रीम घालावे व टोस्टचे २-३ छोटे तुकडे घालावेत.

Author