भावना

एका बेसावध वळणावर
तू मला भेटलीस ......
मला तुझ्यात गुंतवून, तू
माझ्यात विरघळलीस ....!

माझ्या सोनेरी क्षणांची
महिरप तू झालीस....
गुलाब,चाफा,अन् केशर कस्तुरी
सुगंधाची बरसात तू केलीस ...!

चार फुलांची आस माझी
तृप्त तू अशी केलीस...
चांदण भरली तुझी मुठ
माझ्या ओंजळीत रिती केलीस !

तप्त ग्रीष्मात सावली झालीस
शीतल संध्येला सखी,
चाहूल लागता मज संकटाची
प्रार्थना येई तुझिया मुखी !

नाते आपले मैत्रीचे ...
स्नेहाळ - मधाळ केलेस तू
तुझ्या प्रेमळ जिव्हाळ्याने
नवे बंध निर्मिलेस तू !!

भावना लाभावी सखी
प्रत्येक जन्माची आस माझी...!
तुझ्या माझ्या मैत्री पुढे
फिकी गोडी, गुळ साखरेची !!

© अरविंद टोळ्ये
९८२२०४७०८०



एका बेसावध वळणावर
तू मला भेटलीस ……
मला तुझ्यात गुंतवून, तू
माझ्यात विरघळलीस ….!

माझ्या सोनेरी क्षणांची
महिरप तू झालीस….
गुलाब,चाफा,अन् केशर कस्तुरी
सुगंधाची बरसात तू केलीस …!

चार फुलांची आस माझी
तृप्त तू अशी केलीस…
चांदण भरली तुझी मुठ
माझ्या ओंजळीत रिती केलीस !

तप्त ग्रीष्मात सावली झालीस
शीतल संध्येला सखी,
चाहूल लागता मज संकटाची
प्रार्थना येई तुझिया मुखी !

नाते आपले मैत्रीचे …
स्नेहाळ – मधाळ केलेस तू
तुझ्या प्रेमळ जिव्हाळ्याने
नवे बंध निर्मिलेस तू !!

भावना लाभावी सखी
प्रत्येक जन्माची आस माझी…!
तुझ्या माझ्या मैत्री पुढे
फिकी गोडी, गुळ साखरेची !!

© अरविंद टोळ्ये
९८२२०४७०८०

Author