भास

चमचम चमकते नाणें दूरी वरुनी दिसले ।
चांदीचे समजूनी मन तयावर झेपावले ।।१।।

निराशा आली पदरीं जाणतां तुकडा पत्र्याचा ।
खोटी चमक बाळगुनी फसविणे गुणधर्म तयाचा ।।२।।

भास ही चेतना ती तर्क वाढीवी कसा ।
दिसून येई सदैव मनावर जो उमटे ठसा ।।३।।

ठसे उमटती संस्कारांनीं बघतां भोवती सारे ।
मनावर बिंबून जाते आणि भासते तेच खरे ।।४।।

दिसून येतो ऊर्जा वापर देह, बुद्धी वा मनीं ।
संस्काराचे बीज अंकुरते परिस्थिती बघूनी ।।५।।

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Author