बाळाजी प्रभाकर मोडक



जन्म : १८४७
मृत्यू : १९०६
कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये विज्ञान शिक्षक. १८७५ साली रसायनशास्त्रावरील आपली टीपणे शिळाप्रेसवर छापून प्रसिद्ध केली. पुण्याला डॉ. कुक यांच्या मार्गदर्शनाखाली सृष्टीज्ञान व रसायनशास्त्राचा अभ्यास केला. ‘निरिंद्रिय रासायनशास्त्र व अधातुरूप तत्त्वे’ हा ग्रंथ १८७६ साली प्रसिद्ध केला. १८७० ते १९०० या काळात राजाराम महाविद्यालयात प्रयोगशाळा प्रमुख होते. यांनी कोल्हापूर जिल्ह्यांतील शाळांमध्ये विज्ञान प्रदर्शने भरवायला सुरुवात केली. मराठीतून उच्च शास्त्रीय विषय शिकवण्याची त्यांना मोठी तळमळ होती.

माहितीस्त्रोत – (म.वि.प.चा.) विज्ञानतंत्रज्ञान कोष

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Author