बाबांच्या रुपांत, तुम्ही आहांत काका

शंभर वर्षे जगा तूम्हीं, काका आमच्यासाठीं

बाबांच्या रुपांत रहा, तुम्ही सर्वांच्या पाठीं १

भाऊ तुम्हीं त्यांचे असूनी, रुप लाभले बाबांचे

तुम्हास बघतां दिवस आठवती, त्यांच्या सहवासाचे २

उशीर झाला होता, जेंव्हा जीवन उमगले

कुणा दाखवूं वाट यशाची, बांबानी तर डोळे मिटले ३

आंबा गेला मोहरुनी, लाविली होती त्यांनी झाडे

दुर्दैवाने आमच्या, बघण्यास नाही ते फळाकडे ४

मध्येच सोडूनी गेले, नाटक चालू असतां

रंगवूनी बाबांची भूमिका पूर्ण करां ते आतां ५

चालू ठेवा मार्गदर्शने, तुम्हीं आपल्या घराण्याची

जोपासण्या शिकवा तुम्ही, जीवनाविषयीं तत्वें त्यांची ६

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Author