आयुर्वेदातील विविध संज्ञा

आयुर्वेदात वापरण्यात येणाऱ्या विविध संज्ञांची यादी व त्याचे थोडक्यात वर्णन-

अग्निदीपक - भूक वाढविणारे पदार्थ किंवा औषध.
अपथ्य - शरीरास/आरोग्यास अहितकारक
अवलेह - साखरेचा गुळाचा पातळ पाक.
कफघ्न -वाढलेला कफ कमी करणारे पदार्थ किंवा औषध.
काढा - काढ्यातील घटकद्रव्याच्या वजनाच्या १६ पट पाणी घालून ते पाणी अष्टमांश(१/८) राहीपर्यंत मंदाग्नीवर उकळविणे.नंतर गाळून घेणे.
कुपथ्य - शरीरास/आरोग्यास अहितकारक
केश्य - केश वाढविण्यास मदत करणारे पदार्थ किंवा औषध.
चूर्ण - सुकलेल्या वनस्पती कुटून मग त्या गाळून तयार झालेला बारीक वस्त्रगाळ पदार्थ.
ज्वरघ्न - तापाचे हनन करणारे पदार्थ किंवा औषध.
दाहकारक -आतड्यात / पोटात जळजळ उत्पन्न करणारे, मसालेदार, तिखट पदार्थ.
पथ्य - शरीरास/आरोग्यास हितकारक
प्राणिज - प्राण्याच्या अवयवापासून अथवा दूध, अस्थी, मूत्र, मल इत्यादींपासून उत्पन्न झालेले किंवा उत्पादित केलेले.
पित्तशामक - वाढलेले पित्त कमी करणारे पदार्थ किंवा औषध.
पित्तहारक - शरीरात पित्त वाढले असता ते कमी करणारे पदार्थ किंवा औषध.
फांट - घटकद्रव्याच्या वजनाच्या चौपट पाणी घालून चांगले उकळवून तयार केलेले द्रावण.
भस्म - एखादा औषधी पदार्थावर जाळण्याची/उष्णतेची प्रक्रिया करून उपलब्ध झालेली राख.
मारण - धातूंचे भस्म तयार करण्याचा एक नियंत्रित विधी.
मूत्रल - शरीरातील दोष लघवीवाटे निघून जावे्त यासाठी मूत्राचे प्रमाण वाढविणारे औषध.
रेचक - ज्या औषधाने रेच/जुलाब होतात असे औषध.
वटिका - गोळ्या
वांतिकारक - सेवन केल्यास उलटी होईल असे पदार्थ किंवा औषध.
वायुकारक - वायू वाढविणारे पदार्थ किंवा औषध.
शोधन - शुद्ध करणे
स्नेहन - वंगणासारखे काम करणारे, चोपडेपणा आणणारे पदार्थ किंवा औषध.
स्वरस - अंगरस. ओल्या वनस्पतीस कुटून व फडक्याने गाळून जो रस निघतो त्या रसाला स्वरस म्हणतात.
स्वेदन - घाम आणणारे पदार्थ किंवा औषध किंवा उपाययोजना.
हिम/शीतकषाय - घटकद्रव्याच्या वजनाच्या सहापट पाणी घालून व रात्रभर भिजत ठेवून सकाळी गाळून घेतल्यावर तयार होणारे औषध.
हीनवीर्य - ज्यात कस उरला नाही असे पदार्थ किंवा औषध..

संकलन :- श्रीधर कुलकर्णी
ज्ञानामृत मंच

-- WhatsApp वरील आरोग्यदूत या ग्रुपवरुन साभार



आयुर्वेदात वापरण्यात येणाऱ्या विविध संज्ञांची यादी व त्याचे थोडक्यात वर्णन-

अग्निदीपक – भूक वाढविणारे पदार्थ किंवा औषध.
अपथ्य – शरीरास/आरोग्यास अहितकारक
अवलेह – साखरेचा गुळाचा पातळ पाक.
कफघ्न -वाढलेला कफ कमी करणारे पदार्थ किंवा औषध.
काढा – काढ्यातील घटकद्रव्याच्या वजनाच्या १६ पट पाणी घालून ते पाणी अष्टमांश(१/८) राहीपर्यंत मंदाग्नीवर उकळविणे.नंतर गाळून घेणे.
कुपथ्य – शरीरास/आरोग्यास अहितकारक
केश्य – केश वाढविण्यास मदत करणारे पदार्थ किंवा औषध.
चूर्ण – सुकलेल्या वनस्पती कुटून मग त्या गाळून तयार झालेला बारीक वस्त्रगाळ पदार्थ.
ज्वरघ्न – तापाचे हनन करणारे पदार्थ किंवा औषध.
दाहकारक -आतड्यात / पोटात जळजळ उत्पन्न करणारे, मसालेदार, तिखट पदार्थ.
पथ्य – शरीरास/आरोग्यास हितकारक
प्राणिज – प्राण्याच्या अवयवापासून अथवा दूध, अस्थी, मूत्र, मल इत्यादींपासून उत्पन्न झालेले किंवा उत्पादित केलेले.
पित्तशामक – वाढलेले पित्त कमी करणारे पदार्थ किंवा औषध.
पित्तहारक – शरीरात पित्त वाढले असता ते कमी करणारे पदार्थ किंवा औषध.
फांट – घटकद्रव्याच्या वजनाच्या चौपट पाणी घालून चांगले उकळवून तयार केलेले द्रावण.
भस्म – एखादा औषधी पदार्थावर जाळण्याची/उष्णतेची प्रक्रिया करून उपलब्ध झालेली राख.
मारण – धातूंचे भस्म तयार करण्याचा एक नियंत्रित विधी.
मूत्रल – शरीरातील दोष लघवीवाटे निघून जावे्त यासाठी मूत्राचे प्रमाण वाढविणारे औषध.
रेचक – ज्या औषधाने रेच/जुलाब होतात असे औषध.
वटिका – गोळ्या
वांतिकारक – सेवन केल्यास उलटी होईल असे पदार्थ किंवा औषध.
वायुकारक – वायू वाढविणारे पदार्थ किंवा औषध.
शोधन – शुद्ध करणे
स्नेहन – वंगणासारखे काम करणारे, चोपडेपणा आणणारे पदार्थ किंवा औषध.
स्वरस – अंगरस. ओल्या वनस्पतीस कुटून व फडक्याने गाळून जो रस निघतो त्या रसाला स्वरस म्हणतात.
स्वेदन – घाम आणणारे पदार्थ किंवा औषध किंवा उपाययोजना.
हिम/शीतकषाय – घटकद्रव्याच्या वजनाच्या सहापट पाणी घालून व रात्रभर भिजत ठेवून सकाळी गाळून घेतल्यावर तयार होणारे औषध.
हीनवीर्य – ज्यात कस उरला नाही असे पदार्थ किंवा औषध..

संकलन :- श्रीधर कुलकर्णी
ज्ञानामृत मंच

— WhatsApp वरील आरोग्यदूत या ग्रुपवरुन साभार

Author