अविनाश बोकील

अविनाश बोकील हे एक नावाजलेले वकील आहेत.



अविनाश बोकील हे एक नावाजलेले वकील आहेत.

अविनाश बोकील यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९६१ रोजी सातारा येथे झाला. त्यांचे पदवीचे आणि काही पदव्युत्तर शिक्षण ठाणे/मुंबई येथे झाले.

त्यांचे शिक्षण एम. कॉम., (मुंबई), एल.एल.एम., (नॉर्वे- मेरीटाईम लॉ आणि पब्लिक इंटरनॅशनल लॉ), डिप्लोमा इन लेबर लॉज व लेबर वेल्फेअर (पुणे), कंपनी सेक्रेटरी (भारत), चार्टर्ड सेक्रेटरी (यू.के.) इतके झालेले आहे.
१९८१ ते १९८९ या काळात त्यांनी विविध कंपन्यात नोकरी केली. डिसेंबर १९८९ ते जानेवारी २००६ या कालावधीत त्यांनी कंपनी सेक्रेटरी म्हणून पुणे येथे प्रॅक्टीस केली. त्यानंतर त्यांनी वकीलीची सनद घेतली व सध्या ते वकील म्हणून प्रॅक्टीस करतात. १९८९ ते १९९८ या कालावधीत त्यांनी काही संस्थात व्यवस्थापन विषय शिकविण्याचेही काम केले.
२००६ साली पुणे येथे झालेल्या जागतिक शांतता परिषदेत त्यांनी “टाळता येण्याजोगा पाण्याचा गैरवापर” तसेच “शांततेची संस्कृती-प्राथमिक गटांची भूमिका” या विषयांवर निबंध सादर केले होते.
भारतीय प्रशिक्षण आणि विकास संस्थेचे ते आजीव सभासद आहेत.

Author