लेखसंग्रह

बॉम्बे टॉकीजची राणी – देविका राणी

Category:

 

हिमांशू रॉय यांच्या निधनानंतर बॉम्बे टोकीज फुटली शशधर मुखर्जी व अशोककुमार त्यातून बाहेर पडले.तरी देविका डगमगली नाही सहायक दिग्दर्शक अमिया चक्रवर्तीला घेऊन चित्रपट काढले १९४५ साली “ज्वारभाटा” काढला. त्यावेळी चक्रवर्तीने “युसुफ खान”नावाच्या एका फळविक्याला आणले. देविका म्हणाली हे नाव चालणार नाही म्हणून त्याचे दिलीपकुमार असे बारसे केले.

  August 11, 2022


साहित्य - ललित

घेई छंद! (आठवणींची मिसळ ११)

Category:

 

मध्यंतरी आपल्या गृपवर डॉ. हरि नरके यांचे सह्या जमवण्याच्या त्यांच्या छंदात आलेल्या अनुभवाबाबत एक पत्र पोस्ट केले होते. त्यांच्या छंदाच त्यानी छान वर्णन झालं होतं. ज्या ज्या कार्यक्रमाला ते हजर रहात त्या त्या कार्यक्रमांतील मंचावर असणा-या सर्व मान्यवरांच्या सह्या ते घेत असत. त्या सर्वाची तपशीलवार नोंद ते ठेवत. त्यानी खूप श्रमांनी हा छंद जोपासल्याचे जाणवले. असे छंद मनापासून केल्याशिवाय जोपासणे कठीण असते. त्यासाठी चिकाटी, वेळ आणि थोडा फार पैसाही खर्च करावा लागतोच. त्यांनी पत्र लिहिलं होतं ते त्यांना आलेल्या कटु अनुभवासंबंधी. एका ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकाराने सही घेण्यासाठी भरपूर मोठी रक्कम मागितल्याचे त्यांनी लिहिले होते. सर्वानीच त्या कलाकाराचा धिक्कार केला. ते सर्व वाचताना माझ्या कांही छंदाबद्दलच्या आठवणी जाग्या झाल्या. मग त्याही तुम्हाला सांगाव्यात असे वाटले.

  August 11, 2022


साहित्य - ललित

भारतमातेच्या वीरांगना – ५२ – महाराणी जिंद कौर

Category:

 

दुलीप सिंघ केवळ ९ वर्षाचे होते आणि राज्याला ब्रिटिशांना विरुद्ध पाहिले युद्ध लढावे लागले. राणी जिंद कौर ह्यांनी जबरदस्त मुकाबला केला, पण त्या असफल झाल्या आणि सत्तेवर इंग्रजी हुकुमातीचा हात आला. दुलीप सिंघ अजूनही राजेच होते, पण मुख्य कारभारात इंग्रजांनी त्यांच्या माणसांची नेमणूक केली. राणी जिंद कौर ह्यांच्या हातून सत्ता गेली. तरी त्या पुढचे जवळपास ५-६ वर्ष संघर्ष करत राहिल्या, इंग्रजांच्या नाकी नऊ आणणारी ही राणी त्यांच्यासाठी भीतीचे कारण बनली. इंग्रजांनी राणीची बदनामी सुरू केली, त्यांना ‘बगावती’ म्हणू लागले. आईबरोबर राहिला तर राजकुमार दुलीप सिंघ ब्रिटिश विरोधी होतील म्हणून त्यांनी ९ वर्षाच्या दुलीप सिंघ ह्यांना इंग्लंडला पाठविले आणि महाराणी जिंद कौर ह्यांना त्यांच्या केसांनी पकडून फरफटत कारावासात बंद केले. उत्तर प्रदेश च्या किल्ल्यातून त्या पळून गेल्या आणि नेपाळ ला वास्तव्य केले. आपल्या मुलापासून दूर. ११ वर्ष त्यांचे वास्तव्य नेपाळ मध्ये होते.तिथल्या महाराजांनी राणीला सुरक्षित ठेवले आणि त्याच्या मान मुरतब्यासह ठेवले.

  August 11, 2022


लेखसंग्रह

वैश्विक मानवी मूल्ये (Universal Human Values -UHV) – नवा प्रयोग

Category:

 

AICTE ने ही संकल्पना प्रथम सुचविली आणि आता ती हळूहळू अंमलात येतेय. तंत्रज्ञांमधील वर्तनविषयक सुधारणा, त्यांच्या आदिम प्रेरणा आणि शिक्षणानंतरच्या भावी काळात कार्यकर्तृत्व अधिक बहरावे या हेतूने तांत्रिक विषयांबरोबरच UHV चे रोपण त्यांच्या मनात व्हावे आणि अधिक मृदू पण तितक्याच ठाम प्रवृत्तीने त्यांनी सगळं स्वीकारावं हा सदर विचारसरणीचा मूळ गाभा !

  August 11, 2022


कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

गर्जते मराठी’त सहभाग

Category:

 

२००९ वर्षाची सुरुवात ‘गानहिरा’ या सुगम संगीत स्पर्धेच्या परीक्षणाने झाली. दादर माटुंगा कल्चरल सेंटर येथे ही स्पर्धा आयोजित केली होती.

  August 11, 2022