Articles by sachingadkari
अल्झेमर्सचा आजार आणि आयुर्वेद
Category:
लेखसंग्रह२१ सप्टेंबर हा दिवस जागतिक अल्झेमर्स दिन म्हणून ओळखला जातो. साजरा केला जातो असे म्हणणे चुकीचे ठरेल कारण आनंद देणारे क्षण किंवा विषय साजरे केले जातात. अल्झेमर्स मध्ये खूप यातना दडल्या आहेत. अल्झेमर्स डिसीज म्हणजे काय, तो कोणी शोधून काढला, त्याची लक्षणे काय असतात, काय काळजी घ्यावी लागते, होऊ नये म्हणून काही उपाय करणे शक्य आहे का, आधुनिक वैद्यक शास्त्र ह्या विषयी काय सांगते अल्झेमर्स दिसीज बद्द्ल आयुर्वेदाचा दृष्टिकोन काय आहे ह्या विषयी जाणून घेऊ या.
अल्कोहोलऐवजी इथेनॉल!
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनउसाच्या इथेनॉलचा इंधनात वापर न करून आपण किती मोठी चूक केली, हे सहज लक्षात येऊ शकते. वस्तुस्थिती ही आहे, की स्वातंत्र्यानंतर साखर निर्मिती कारखान्यांमध्ये तयार होणाऱ्या इथेनॉलचा संपूर्णपणे इंधन म्हणून वापर केला असता, तर आज भारतावर एका पैशाचेही कर्ज राहिले नसते. किमान आतातरी सरकारने उसापासून इथेनॉल आणि धान्यापासून मद्य निर्मितीचे धोरण स्वीकारून विनाकारण खर्च होणाऱ्या विदेशी चलनाची बचत करावी!
जागो ये मुर्दों का गांव !
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनसंपूर्ण समाजच बधीर झाला आहे नव्हे जणू मृतप्रायच झाला आहे. येणार्या संकटाची जाणीवच नसल्याने त्यावर विचार करून लोकसंख्या नियंत्रणाच्या दृष्टीने काही उपाय योजणे, त्याचबरोबर मूलभूत गरजा भागविण्याच्या दृष्टीने नियोजनाला सुरूवात करणे याविषयी कोणी बोलतानादेखील दिसत नाही. म्हणूनच कबीराने म्हटल्याप्रमाणे ‘जागो ये मुर्दोंका गांव’ असे म्हणायची वेळ आली आहे.
लोकशाही – नवी व्याख्या
Category:
साहित्य - ललितलोकशाहीची नवी व्याख्या – वाचून तर बघा……
ज्वारी आणि मद्यनिर्मिती!
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखन03जानेवारी 2010
ज्वारीपासून निर्माण झालेली दारू उसाच्या मळीपासून तयार होणाऱ्या दारूपेक्षा अधिक दर्जेदार असू शकते आणि त्याचा परिणाम ऊस कारखानदारांच्या ‘दारू सुबत्ते’वर होऊ शकतो, ही भीती देखील या कारखान्यांना विरोध करण्यामागे असू शकते. मात्र ह्या सर्वांना मला नम्रपणे हेच सुचवावेसे वाटते की, जर मद्य निर्मितीकरिता धान्याचे अल्कोहोल वापरल्या गेले तर उसाच्या मळीपासून बनविलेले विषारी अल्कोहोल पोटात न टाकता ते वाहनांच्या टाकीत टाकता येऊ शकतो. ह्या सर्वांना मला नम्रपणे हेच सुचवावेसे वाटते की, जर मद्यनिर्मितीकरिता धान्याचे अल्कोहोल वापरल्या गेले तर उसाच्या मळीपासून बनविलेले विषारी अल्कोहोल पोटात न टाकता ते वाहनांच्या टाकीत टाकता येऊ शकतो.
या अनुशेषाचे काय?
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखन27 डिसेंबर 2009
मुख्यमंत्र्यांनी विदर्भासाठी दहा हजार कोटीचे पॅकेज दिले; परंतु त्यातील बहुतेक निधी आधी सुरू झालेल्या योजनांची पुर्तता करण्यासाठीच आहे. नव्या योजना त्यात नाही, विशेषत: सिंचनाच्या बाबतीत हे पॅकेज कोरडेच आहे. सरकारने देण्याचा उत्साह दाखविला नाही आणि विरोधकांनी खेचून आणण्याचा प्रयत्न केला नाही.
आठवणीतलं पुस्तक – मुंबई दिनांक
Category:
परिचय – परिक्षण साहित्य - ललितलहानपणापासून सारं आयुष्य ग्रंथाच्या सहवासातच गेलं, तरी एखाद्याला वाचनाचा नाद लागेलच, असं सांगता येणं कठीण आहे. तसं असतं तर प्रत्येक ग्रंथविक्रेता हा चांगला वाचक झाला असता. पण तस होतं नाही. मात्र याचा मात्र नेहमीचं खरा ठरतो. आणि वाचनाचा नाद असलेला ग्रंथविक्रेता हा उत्तम पुस्तकविक्रेता होतो! मला स्वत:ला वाचनाचा नाद नव्हे वेड आहे, अगदी लहानपणीच लागलं. त्याचं कारण ग्रंथांच्या सहवासात गेलेलं बालपण हेच होय.
पानिपत – विश्वास पाटील
Category:
परिचय – परिक्षण साहित्य - ललितमराठी माणसाला इतिहासात रमायला नेहमीच आवडतं. त्यातही तो इतिहास आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाच्या कहाण्या सांगणारा असला, तर बघायलाच नको! वर्तमानातील कठोर वास्तवापासून दोन क्षण का होईना दूर जाता येणं, हा त्यातील बहुधा सर्वात मोठा लाभ असावा. त्यामुळेच कायम गतकालात, इतिहासात रमणार्या व्यक्तीची पलायनवादी अशा शब्दात अनेकदा हेटाळणीही केली जाते. तरीही ‘पूर्व दिव्य ज्यांचे, त्यांना रम्य भावी काल!’ या पंक्तीवर भरवसा ठेवून असेल कदाचित, मराठी माणूस हा इतिहास आणि पुराणकथांमध्येच रममाण झालेला आढळतो. त्यातही मराठी माणसाचा सर्वात आवडता काल म्हणजे सतराव्या शतकात छत्रपती शिवरायांपासून सुरू होणारा आणि पुढे एकोणीसाव्या शतकात पेशवाईच्या अखेरीस येऊन थांबणारा, हे आता सर्वश्रुत झालं आहे. त्यामुळेच मराठीतील अनेक कादंबर्या आणि नाटकं ही याच कालातील गौरवशाली घटनांवर आधारित आहेत.
अर्थापोटी अनर्थ टाळा !
Category:
लेखसंग्रहनुकतीच एक बातमी वाचली कि भारतात तरूण लोकांमध्ये ह्रदयविकार, मधुमेह आणि रक्तदाबाचे प्रमाण वाढत चालले आहे. याची कारणमींमासा करताना बदलती जीवनशैली, ताण, खाण्यापिण्याच्या सवयी यासारख्या गोष्टींकडे बोट दाखवले गेले. थोडक्यात ‘हे होणारच’ असा सूर आहे.