अवर्गिकृत

हा तर पुरुषाचाच धिक्कार

Category:

 

स्त्री-पुरुष संबंधांचा व त्यांच्यातील नात्याचा गाभा काय, याचा शोध घेण्याचा प्रयत्न आजवर अनेकांनी केला आहे आणि अजूनही करत आहेत. स्त्री-पुरुषांचे शारीरिक मीलन अपत्यप्राप्तीपर्यंत जाते. म्हणून त्यांच्यातील नाते नैसर्गिक आहे, अशी पुरुषी समाजाची धारणा असते. पण जे नैसर्गिक आहे, ते नैतिक कशावरून? स्त्री-पुरुष संबंध नैसर्गिक अवस्थेत परिपूर्ण असू शकत नाहीत. त्यावर प्रेम, आदर, समानता हे संस्कार झाले, तरच ते नैतिक होतात. निव्वळ नैसर्गिक संबंध ही प्रकृती आणि अनैसर्गिक मार्गाने मिळालेले सुख ही विकृती होय. पण जेव्हा या संबंधांवर प्रेम, विश्वास आणि आदर याचा साज चढवला जातो, तेव्हाच ती संस्कृती ठरते.

  August 14, 2010


अवर्गिकृत

लग्नं मुलांची … चिंता पालकांची

Category:

 

‘घर’ आणि ‘लग्न’ या दोन शब्दांशी ‘चिता’ नावाची गोष्ट जोडूनच येते. आणि माणसाच्या जीवनात या दोन्ही गोष्टींना सहसा

पर्याय नसतो. या दोन गोष्टींबद्दल चिता वाटणं हीसुद्धा एक ‘समाजमान्य’ गोष्ट आहे. त्यामुळेच विवाहसंस्था चालवत असताना

काही प्रमाणात का होईना, पालकांच्या चिता कमी करण्यात आम्हाला मदत करता येते, हा आनंदाचा भाग वाटतो.

  August 14, 2010


साहित्य - ललित

आम्ही सार्‍याच गांधारी

Category:

 

किती युगं लोटली गांधारी होऊन गेल्याला. गांधारी! नव्हे, नव्हे- पतिपरायण गांधारी. सती-साध्वी गांधारी. किती शतकं उलटली

पतिपरायण गांधारी होऊन गेल्याला. काळाची उलथापालथ झाली. कलियुग अवतरलं. वर्णसंकर झाला. वर्णसंकराचा बाऊ वाटेनासा

झाला. माणसांचीही उलथापालथ झाली. पोशाख बदलले. आचार-विचार बदलले. पाश्चात्त्य-पौर्वात्य भेदाभेदातलं अंतर फारसं उरलं

नाही. स्त्री- पुरुषांच्या कुटुंबातल्या जबाबदाऱ्यांची सरमिसळ झाली. आर्थिक सहभागाची तिला मुभा मिळाली. शिक्षणाची दारं तिच्यासाठी खुली झाली. बदलली नाही ती स्त्रीविषयक धारणा. पुरुषांची तर नाहीच नाही. सुखासुखी हाती आलेले सर्वाधिकार

फारच थोडे सोडू शकतात. बव्हंशी (मूठभर 20 टक्के सोडून) स्त्रीचीही स्वत:विषयीची धारणा बदलली नाही. पतिपरायणतेचं बिरुद मिरविण्याची स्त्रीची हौस फिटली नाही आणि पतिपरायण स्त्री ही पुरुषाची हावही सुटली नाही. कारण आम्हाला हव्या आहेत फक्त गांधारी.

  August 14, 2010


लेखसंग्रह

अंतर्गत मतभेदांनी ग्रासले राज्यकर्ते

Category:

 

भिन्न मतप्रवाहांचे अनेक पक्ष एकत्र घेऊन सरकार चालवणे अवघड असल्याचा अनुभव पंतप्रधान डॉ. मनमोहन सिग यांना रोजच येत आहे. विविध पक्षांचे मंत्री एकमेकांवर आरोप करत असताना काँग्रेसचे वरिष्ठ मंत्रीही गेल्या काही दिवसांपासून सहकार्‍यांबद्दल जाहीर विधाने करताना दिसत आहेत. त्यांच्यात अनेक मुद्यांवर असलेले मतभेद सतत चव्हाट्यावर येत आहेत. अशा परिस्थितीत मनमोहन सिंग निष्प्रभ आणि हतबल दिसत आहेत.

  August 14, 2010


अवर्गिकृत

आपला भारत देश महासत्ता होणार आहे….

Category:

 

होणार तर होऊ द्या

आमचा काही तंटा नाही.

तुमच्या भव्य स्वप्नांपुढे

आमची काही नकार घंटा नाही.

पण लक्षात ठेवा………

  August 12, 2010


लेखसंग्रह

रक्तदाते शोधा आता ऑनलाईन

Category:

 

आता रक्तदात्यांची सूचीही ग्लोबल होत आहे. रक्तदात्यांची माहिती देणार्‍या अनेक वेबसाईटस सुरु होत आहेत आणि त्या लोकप्रियही होत आहेत.

  August 12, 2010


अवर्गिकृत

मानवधर्म जगू बघणार्‍या अल्पसंख्य माणसाची कहाणी….

Category:

 

अल्पसंख्य ह्या विजय पाडळकर ह्यांनी लिहिलेल्या कादंबरीचा परिचय….

  August 12, 2010


लेखसंग्रह

सामना रद्द करविणारा रॉबिन नि धडका घेणारा ब्रूस

Category:

 

…खेळाडूने मारलेला चेंडू प्रेक्षकांमध्ये गेला. तो एकाने परत फेकला – तो आला आणि पडला ब्रूसच्या डोक्यावर! भुवयांजवळ जखम झाली. बिचारा जवळच्या दवाखान्यात टाके घालून घेण्यासाठी जात असताना मुख्य प्रवेशद्वाराजवळ त्याला एक कार धडकली. टाके घालण्याची प्रक्रिया …

  August 12, 2010