अवर्गिकृत

उशिरा सुचलेले शहाणपण……म्हणे पाकिस्तान अत्यंत धोकादायक राष्ट्र

Category:

 

शांतता, सुरक्षितता, सौहार्द, शिक्षण, आरोग्य, रोजगार आदी बाबींपासून कोसो दूर असलेला देश धोकदायक असणार नाही तर काय ? पाकिस्तानात जोपर्यंत इजिप्त, ट्युनिशिया, लिबिया प्रमाणे विद्रोह होत नाही व या हुकुमशहांना कायमचे संपविले जात नाही तोपर्यंत पाकी जनतेला सुख मिळणार नाही व तेथील धोकादायक परिस्थिती संपणार नाही.

फक्त पाकिस्तानच धोकादायक नसून तेथे वारंवार येणारे सैनिकी हुकुमशहा हे सुद्धा संपूर्ण जगाला धोकादायक आहेत…..!

  March 28, 2011


अवर्गिकृत

पाकिस्तान्यांनो… तुम्ही कितीही खोड्या काढा….आम्ही तुम्हाला मानाने बोलावणारच

Category:

 

मोहालीचा भारत-पाकिस्तान सामना बघायला पंतप्रधानांचे खास मेहमान पाकिस्तानातून येणार आहेत. बिघडलेले भारत पाक संबंध क्रिकेट मॅचदरम्यान बिर्याणी खाता खाता झटक्यात सुधारणार आहेत. आणि संबंध सुधारले की बिचार्‍या कसाबदादा आणि अफझलभाऊंची रवानगी मायदेशात केली जाणार आहे. जय हो!!!!!!!!!!!!!! . .

  March 27, 2011


लेखसंग्रह

पशुधन घटते; दूध कसे वाढते?

Category:

 

कायदा काही करणार नाही, कायदा काही करू शकत नाही, कारण कायदा राबविणारी व्यवस्थाच पंगू आहे, गुलाम आहे. त्यामुळे लोकांनीच आता स्वयंस्फूर्तपणे काही करणे गरजेचे आहे. बहिष्कार हे एक मोठे अस्त्र आहे, ते अहिंसक तर आहेच शिवाय अतिशय प्रभावी आहे. दूध माफियांना धडा शिकवायचा असेल तर लोकांनी दुधावरच बहिष्कार टाकायला हवा.

  March 27, 2011


लेखसंग्रह

आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि युवकांची भूमिका

Category:

 

“धर्मांधतेने आणि धार्मिक कट्टरवादाच्या विषवृक्षाला आलेली गोंडस पण सर्वनाशाकडे नेणारी फळे म्हणजे दहशतवाद होय.” आतापर्यंत भारताचे अनेक तुकडे पाडण्यात परकीय सत्ता यशस्वी झाल्यात. पाकीस्थान, बांगलादेश, नेपाळ तसेच अफगाणिस्थान हा भाग भारतातूनच तोडल्या गेला हे इतिहासावरून सहज समजेल . अफगाणिस्थानातील ‘हिंदुकृश’ पर्वतरांगांच्या नावावरून सहज लक्षात येईल.आजपर्यंत भारताने वारंवार दहशतवादाचे विकारल स्वरूप जगापुढे मांडले, परंतु प्रत्यक्ष झळ पोहचेपर्यंत अमेरिकाही जागी झाली नाही.

  March 27, 2011


अवर्गिकृत

बहुउपयोगी औदुंबर

Category:

 

औदुंबर हे वृक्ष पक्ष्यांच्या विष्ठेतून बिया आल्यावरच उगवते,पर्यावरणीय संतुलना सोबतच मानवाला या वृक्षाचा मुखरोग, चेचक, रक्तपित्त, भस्मक रोग, अतिसार, पोटाचे दुखणे, भगंदर, श्वेत प्रदर, रक्तप्रदर, गर्भपातापासून बचावासाठी, मूत्रविकार, पित्तविकार, सुजन, हृदयविकार, त्वचाविकार, कानाचे दुखणे अशा विविध आजारांवर उपयोग होतो.

  March 26, 2011


अवर्गिकृत

मर्ढेकरांची कविता – पिंपात मेले ओल्या उंदिर

Category:

 

मर्ढेकरांची पिंपात मेले ओल्या उंदिर कविता – दुसऱ्या महायुध्दात झालेल्या ज्यूंच्या हत्याकांडाचा तसेच तत्कालीन आंतरराष्ट्रीय राजकारणाचा संदर्भ

  March 24, 2011


अवर्गिकृत

धोबी घाट`- बाहेरच्यांची मुंबई

Category:

 

`धोबी घाट`बद्दल त्याच्या प्रदर्शनापासून एक संभ्रमाचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळतं. खरं तर तसं असण्याला कारण नाही. हा चित्रपट वेगळा आहे, असणार, हे आपल्याला अपेक्षित तर होतंच. त्याच्या पूर्वप्रसिद्धीपासून ते `धोबी घाट` या वरकरणी चमत्कारिक नावापर्यंत सर्वच बाबतीत त्याचा हा वेगळेपणा अधोरेखित कऱण्यात येत होता.

  March 23, 2011


अवर्गिकृत

हो ते भारतीयच आहेत.. पण आपणच ते विसरतो…

Category:

 

काल-परवाच एक बातमी वाचली होती.. अरूणाचल प्रदेशात रामदेवबाबांनी अरूणाचलमध्ये त्यांचं योग शिबीयेभरविले

होते.. योगाभ्यास घेताना मध्ये मध्ये ते वेगवेगळ्या विषयांवर बोलत होते… त्यावेळी त्यांनी देशात बोकाळलेला

भ्रष्टाचार आणि कॉंग्रेस याबाबात बोलाण्यास सुरूवात केली.. त्यावेळी तिथे कॉंग्रेसचेच अरूणाचलल मधुन निवडून

आलेले एक सदस्य उपस्थित होते.. ते चिडले.. आणि चक्क रामदेव बाबांना म्हणाले ”यु ब्लडी इंडियनस्” (????)

  March 23, 2011


अवर्गिकृत

वृत्तपत्रात अस्सल मराठी वापरावी का

Category:

 

लोकमतच्या औरंगाबाद (मराठवाडा) आवृत्तीचे निवासी संपादक चक्रधर दळवी यांचे ‘मराठीच्या पिंडावरील कावळे’ हे भाष्य नुकतेच वाचण्यात आले. त्यात ते म्हणतात, एखाद्या प्रसंगात एखाद्या व्यक्तीने अविवेकी भाषा वापरली असेल, आणि त्या प्रसंगाची बातमी करायची असेल तर वृतपत्रांनी काय करावे? बातमीत ही भाषा वापरावी का ‘फुल्या-फुल्या’ मारून वेळ मारून न्यावी?

  March 23, 2011