न जाणलेले भगतसिंह….
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site२३ मार्च १९३१ हा शहीद दिवस म्हणून ओळखला जातो.. ज्या ऐतिहासिक दिवशी भगत सिंह ,सुखदेव आणि राजगुरु हे तिघे वीर पुरुष हसत हसत, भारतासाठी फासावर चढून शहीद झाले. त्या काळी कितीतरी जवान वीरांनी क्रांतिकारी होण्याचा निर्णय घेऊन कायमचा घराला राम राम केला असणार आणि त्याची दखलही आपल्या इतिहासाने घेतली नसेल.