लेखसंग्रह

दीर्घायुषी पोपट

Category:

 

पोपटांच्या आकलनशक्तीवर आधारलेल्या पूर्वीच्या संशोधनात पोपट आणि माणसाच्या मेंदूतील अनेक साम्यस्थळं स्पष्ट झाली होती. यांनुसार माणसाप्रमाणेच पोपटाच्या मेंदूचा आकारही, शरीराच्या आकाराच्या तुलनेत मोठा असतो. तसंच दोघांच्या मेंदूच्या पुढच्या भागात मज्जापेशींची संख्या मोठी असते. इतकंच नव्हे तर, दोघांच्या जनुकीय आराखड्यातल्या, मेंदूच्या विकासाशी संबंधित भागांतही मोठं साम्य दिसून आलं आहे. माणसाला जशी उत्तम आकलनशक्ती आणि दीर्घायुष्य मिळालं आहे, तसंच पोपटाच्या बाबतीतही उत्तम आकलनशक्ती आणि दीर्घायुष्य यांचा मिलाफ घडून आला आहे.

लेखसंग्रह

तळ्याकाठचे निअँडरटाल

Category:

 

निअँडरटाल ही मुख्यतः शिकारीवर जगणारी प्रजाती होती. त्यामुळे ते कदाचित खाद्य गोळा करण्यासाठी या तळ्याशी आले असावेत. मात्र या निअँडरटालांनी मोठ्या प्राण्याची शिकार केल्याचा पुरावा काही या वाळूच्या थरावरील खुणांवरून मिळाला नाही. तळ्यातले मासे पकडण्यासाठी, छोटे कवचधारी मृदुकाय प्राणी गोळा करण्यासाठी किंवा तळ्यावर येणाऱ्या पक्ष्यांची शिकार करण्यासाठी ते आले असावेत. कारण या परिसरातील निअँडरटालांच्या खाद्यात या गोष्टींचा समावेश असायचा. या ठशांच्या बाबतीतला एक वेगळाच भाग म्हणजे, ज्या सहा वर्षांच्या दोन छोट्या मुलांच्या पायांचे ठसे इथे आढळले आहेत, ते फक्त ठरावीक दिशेनंच गेलेले दिसत नाहीत. ते इकडेतिकडे विखुरले आहेत. यावरून या संशोधकांनी, ही दोघं लहान मुलं वाळूत खेळत असावीत, खेळताना ती इकडेतिकडे बागडत असावीत, असा एक सरळ साधा, पण मनोरंजक निष्कर्ष काढला आहे.

लेखसंग्रह

‘निस्तेज’ होणारी पृथ्वी

Category:

 

सिरिस उपकरणांनी गेली काही वर्षं, कमी उंचीवरील ढगांकडून होणाऱ्या प्रारणांचं प्रमाण कमी होत असल्याचं नोंदवलं आहे. कमी होणारं प्रारणांचं हे प्रमाण, कमी उंचीवर पूर्वीइतके ढग तयार होत नसल्याचं दर्शवतं. कमी उंचीवरील ढगांचं कमी प्रमाणात निर्माण होणं आणि चंद्रावरचा पृथ्वीप्रकाश कमी होणं, हे एकाच वेळी घडत असल्याचं या संशोधकांना आढळलं. कमी उंचीवरील ढगांच्या प्रमाणाचा आणि पृथ्वीप्रकाशाच्या तीव्रतेचा थेट संबंध या तुलनेतून स्पष्ट झाला. कमी उंचीवरचे ढग हे सूर्यप्रकाश अधिक प्रमाणात परावर्तित करतात. या कमी उंचीवरील ढगांचं प्रमाण कमी होत असल्यानंच, पृथ्वीकडून सूर्यप्रकाश परावर्तित करण्याचं प्रमाण कमी झालं आहे. त्यामुळेच पृथ्वी निस्तेज होत चालली आहे.

लेखसंग्रह

मानवी वंशवृक्षाची पाळंमुळं

Category:

 

प्रत्येक सजीवाला त्याचे गुणधर्म हे त्याच्या पेशींतील जनुकांच्या रचनेनुसार प्राप्त होतात. जनुक म्हणजे सजीवाच्या पेशीतल्या डीएनए रेणूंतल्या विशिष्ट रासायनिक रचना. पेशींतील जनुकांच्या संपूर्ण माहितीला, सजीवाचा ‘जनुकीय आराखडा’ म्हटलं जातं. सजीवाच्या जनुकीय आराखड्यात विविध कारणांनी कालानुरूप बदल होत जातात. हे जनुकीय बदल त्या सजीवाच्या स्वरूपात बदल घडवून, त्या सजीवाच्या उत्क्रांतीला कारणीभूत ठरतात. आज अस्तित्वात असलेल्या सजीवांच्या जनुकीय आराखड्यांची प्राचीन काळातील सजीवांच्या जनुकीय आराखड्यांशी तुलना करून त्या सजीवाच्या उत्क्रांतीचा अभ्यास करता येतो.

परिचय - परिक्षण

उंबरठ्याच्या आतली घुसमट

Category:

 

मनोविकास प्रकाशन संस्थेने तामिळ लेखिका सलमा यांचे व सोनाली नवांगुळ यांनी अनुवाद केलेले पुस्तक ज्याला साहित्य अकादमीचा नुकताच पुरस्कार मिळाला हे पुस्तक प्रसिद्ध केलं आहे. या कादंबरीला उत्कृष्ट अनुवादिसाठी साहित्य अकादमीने पुरस्कार देऊन गौरविलेली आहे. तसे प्रत्येकाचे तास ज्याचे त्याचेच असतात. जिथे प्रेम आहे तिथे काही तासावर दुसऱ्यांचीही हुकुमत असते. मध्यरात्रीनंतरचे तास आपल्या हातात नसतात, त्यांच्यावर आठवणींची, विचारांची,शरीराची, प्रेमाची, वासनेची हुकुमत असतें.लैंगिक घुसमट होणाऱ्यांची मध्यरात्रीनंतर अवस्था  बेचैन  करणारी असतें.

लेखसंग्रह

कुठे आहे शिक्षण? कुठे आहे मूल्यमापन?

Category:

 

ज्यांचे शिक्षण झाले किंवा नाही माहित नसतांना त्यांचे मूल्यमापन करण्याचे आव्हान सध्या आहे. कॉपी रोखणे जसे ऑफलाईन मध्ये आव्हान होते तसेच आव्हान ऑनलाइन परीक्षा पद्धतीमध्ये ही आहे. ऑफलाइन परीक्षेमध्ये प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्यांना यश मिळत असे पण ऑनलाईन परीक्षेमध्ये अभ्यास न करणारें ही  वरचढ ठरत आहेत

लेखसंग्रह

एडटेक कंपन्यांचे शैक्षणिक संस्थांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह?

Category:

 

संवादात्मक स्क्रीन ,ऑनलाइन वर्ग तसेच एड टेक स्टार्टअप मुळे विषय अधिक चांगल्या प्रकारे समजतो ,शिकणें मनोरंजक  व जटील संकल्पना समजण्यास मदत होते. संबोध स्पष्ट नसणें हेच शिक्षणाच्या पिछेहाटीचं कारण आहे. पोपटपंची ने करिअर करण्याचे दिवस आता संपले आहेत. शैक्षणिक परीणाम वाढविण्यासाठी डिझाईन केलेले तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर वापरून शिक्षण अधिक आकर्षक व सुलभ बनविले जात आहे.

वैजयंती माला यांनी ‘माझा होशिल का? हे गाणं म्हणून दाखवलं
इतर मराठी व्हिडिओज

वैजयंती माला यांनी ‘माझा होशिल का? हे गाणं म्हणून दाखवलं

Category:

 

हिंदीवाल्यांच्या चित्रकथेच्या ‘जाणकारी’ बद्दल ‘अपवाद’ वगळता गदिमांचं फारसं चांगलं मत नव्हतं. त्यामुळे ते शक्यतो त्यांना झटकून टाकत असत. पण कधीकधी अशा गमती घडत कि गदिमांनासुद्धा ‘माघार’ घ्यावी लागे…

आम्हा भावंडाचे ‘वाघाबरोबर’ सहभोजन!
इतर मराठी व्हिडिओज

आम्हा भावंडाचे ‘वाघाबरोबर’ सहभोजन!

Category:

 

पपा (गदिमा) परिक्षेनंतर पेपर सोडवून घेत तेंव्हा तर भर दिवसा आमच्यासाठी ‘कत्तलची रात्र’ ऊगवत असे.