आमरस घालून शेवयाचा शिरा
Category:
खाद्ययात्रापाण्याला उकळी आली की त्यात शेवया टाकून जरा उकळू द्यावे. शेवया शिजल्या की लगेच चाळणीवर ओताव्या व वरून गार पाणी घालावे.
Category:
खाद्ययात्रापाण्याला उकळी आली की त्यात शेवया टाकून जरा उकळू द्यावे. शेवया शिजल्या की लगेच चाळणीवर ओताव्या व वरून गार पाणी घालावे.
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाचकोर पक्षी हा कोवळ्या चंद्रकिरणातील अमृत पिऊन जगतो अशी एक कल्पना आहे. चंद्रकिरणामधे शीतलता, मृदुता आणि संजीवकता असते. तिचा लाभ चकोराला होतो. असे हळुवार चंद्रकिरणांसारखे मृदुत्व योग्याच्या ठिकाणी असते. हे मृदुत्व आणखी कोणासारखे? तर पक्षिणीच्या पंखासारखे असते. आईच्या पंखांचा आश्रय हे पिलांचे सर्वस्व असते. कारण पंखांमुळे त्यांना उबारा मिळतो. पिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते. योगी पुरुषांचेही असेच असते. त्यांच्यामुळे सर्वसामान्य माणसाला मानसिक आधार लाभतो..
Category:
शहरे आणि गावेपुणे हे महाराष्ट्रातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर. पूर्वी पुणे शहर हे पेठांचे शहर म्हणून प्रसिध्द होते. या सर्व पेठा नदीच्या आसपासच्या भागात होत्या. या पेठांची नावे बहुतकरुन आठवड्यातील वारांनुसार, तसेच ज्यांनी या पेठा वसविल्या अशा इतिहासकालीन व्यक्तींच्या नावावरुन ठेवली आहेत.
Category:
शहरे आणि गावेरायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे जगातील दुसर्या क्रमांकाची हवामान निरीक्षणाची प्रयोगशाळा आहे. ही वेधशाळा इ.स. १९०४ पासून कार्यरत असून या वेधशाळेला आंतराराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
Category:
कथा साहित्य - ललितमहानगरातली रात्र. लखलखणाऱ्या दिव्यांची दिवाळी असल्यासारखी सजलेली. पण त्या सर्व गजबजाटापासून दूर असलेला, समुद्र किनाऱ्यालगत असलेला, श्रीमंत समजल्या जाणाऱ्या वस्तीतला एक बंगला. या बंगल्याला असलेली अखंड सोबत समुद्राच्या गाजेची.
Category:
शहरे आणि गावेवाई हे सातारा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या या शहरात सरदार रास्ते यांनी १७६२ मध्ये ढोल्या गणपतीचे मंदिर बनविले.
Category:
कथा साहित्य - ललितशेखर आणि मीनूची नेहमीप्रमाणेच ऑफिसमध्ये जायची धांदल सुरू होती आणि त्यांची ती धांदल बघत राजू नेहमीसारखाच फुरंगटून बसला होता. पण नेहमीच्या फुरंगटण्यापेक्षा आजचं फुरंगटणं थोडं वेगळं होतं. त्याचा चेहरा काहीसा मलूल झाला होता. अंगही काहीसं शिथील होऊन सैलावलं होतं, खिडकीबाहेर तो बघत होता. समोरचं टी. व्ही. टॉवर, मल्टीस्टोरीड बिल्डिंग्ज, रस्त्यावरून धावणाऱ्या सोलार फोर व्हिलर्स. पण त्याची केवळ दृष्टी त्या दृश्यावर होती. त्याच्या आकलनात मात्र काहीही येत नव्हतं.
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्र व गुजरात राज्यांच्या सीमेजवळ वसलेले नंदुरबार हे खानदेशातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. १ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन करुन नंदुरबार हा वेगळा जिल्हा करण्यात आला.
Category:
लेखसंग्रहलग्न-मुंजीचा सोहळा, घरगुती सण समारंभ असो किंवा कॉर्पोरेट मिटींग असो, साडी हा असा पोषाख आहे जो कुठल्याही प्रसंगी परिधान केला तरी चालतो. म्हणूनच वेस्टर्न कल्चरचा कितीही प्रभाव पडला तरी स्त्रियांच्या मनातील आणि कपाटातील आपले स्थान साडीने अजूनही कायम ठेवले आहे. शरीरयष्टी कशीही असली, रंगरुप कसेही असेल तरी प्रत्येक स्त्रीला साडी शोभूनच दिसते.
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे येथील शिवकालीन लाल महालात शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते. त्यांचे बालपणही याच महालात गेले. याच ठिकाणी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे कापली.
Copyright © 2025 | Marathisrushti