आत्ता चं दिवस हे दिवसासारखं,
खरंच मला वाटत नाही....
आत्ता माझ्या चेहऱ्यावर,
खरंच हसू येत नाही....
आत्ता तुझ्या आठवणी विना ,
मला काही आठवत नाही....
आत्ता वाटतं तुझ्या विना,
काहीही जीवनात नाही....
आत्ता प्रिये तुझ्या सारखं,
कुणी गोड बोलत नाही....
एकाकी एकटा असतो,
कुणीही विचारत नाही....
आत्ता प्रिये पूर्वीसारखं,
नवं काय स्वप्नात नाही....
एकटेपणा आहे फक्त,
जगावसं वाटत नाही....
माझं प्रेम - माझी तू ,
काहीही नशिबात नाही....
आत्ता प्रिये तुझ्या विना,
काहीही जीवनात नाही....
-- गजानन साताप्पा मोहिते
आत्ता चं दिवस हे दिवसासारखं,
खरंच मला वाटत नाही….
आत्ता माझ्या चेहऱ्यावर,
खरंच हसू येत नाही….
आत्ता तुझ्या आठवणी विना ,
मला काही आठवत नाही….
आत्ता वाटतं तुझ्या विना,
काहीही जीवनात नाही….
आत्ता प्रिये तुझ्या सारखं,
कुणी गोड बोलत नाही….
एकाकी एकटा असतो,
कुणीही विचारत नाही….
आत्ता प्रिये पूर्वीसारखं,
नवं काय स्वप्नात नाही….
एकटेपणा आहे फक्त,
जगावसं वाटत नाही….
माझं प्रेम – माझी तू ,
काहीही नशिबात नाही….
आत्ता प्रिये तुझ्या विना,
काहीही जीवनात नाही….
— गजानन साताप्पा मोहिते