कधी कधी जुन्या रेडिओसारखं
आपलं मनही एकाच व्यक्तीला शोधत राहतं...
गर्दीतल्या हजारो आवाजांतून
एकच सुर कानाशी येत राहतो,
आणि आठवणींच्या लहरींवर
तोच चेहरा तरंगत राहतो.
कधी शब्द सापडत नाहीत,
कधी भावना हरवून जातात,
पण मनाच्या त्या जुन्या फ्रिक्वेन्सीवर
त्याच्याच आठवणी वाजत राहतात.
वेळ पुढे सरकत असतो,
ऋतू बदलत राहतात,
पण काही नाती अशी असतात
जी मनाच्या कोपऱ्यात शांतपणे जगत राहतात.
जुन्या रेडिओचा खडखडाट जसा
एक दिवस अचानक सुरेल होतो,
तसंच कधीतरी एखादं स्मित
संपूर्ण आयुष्य उजळून टाकतं.
आणि मग कळतं...
शोध संपलेला नसतो कधीच,
कारण काही माणसं
दूर गेल्यावरही मनातच राहत असतात.
अशी काही नाती अंतराने तुटत नाहीत, ती फक्त आठवणीत अधिक खोल रुजत जातात.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
कधी कधी जुन्या रेडिओसारखं
आपलं मनही एकाच व्यक्तीला शोधत राहतं…
गर्दीतल्या हजारो आवाजांतून
एकच सुर कानाशी येत राहतो,
आणि आठवणींच्या लहरींवर
तोच चेहरा तरंगत राहतो.
कधी शब्द सापडत नाहीत,
कधी भावना हरवून जातात,
पण मनाच्या त्या जुन्या फ्रिक्वेन्सीवर
त्याच्याच आठवणी वाजत राहतात.
वेळ पुढे सरकत असतो,
ऋतू बदलत राहतात,
पण काही नाती अशी असतात
जी मनाच्या कोपऱ्यात शांतपणे जगत राहतात.
जुन्या रेडिओचा खडखडाट जसा
एक दिवस अचानक सुरेल होतो,
तसंच कधीतरी एखादं स्मित
संपूर्ण आयुष्य उजळून टाकतं.
आणि मग कळतं…
शोध संपलेला नसतो कधीच,
कारण काही माणसं
दूर गेल्यावरही मनातच राहत असतात.
अशी काही नाती अंतराने तुटत नाहीत, ती फक्त आठवणीत अधिक खोल रुजत जातात.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
Post Views: 1