असाचं हसत जा,
जणू काही हरवलंच नाही,
डोळ्यांतल्या सावल्या
हसण्याच्या आड लपवत जा.
जखमा दिसू नयेत म्हणून
हसू शस्त्रासारखं वापरत जा,
प्रत्येक “मी ठीक आहे”मध्ये
थोडंसं स्वतःला विसरत जा.
लोकांना हसरा चेहरा हवा असतो,
आतला आवाज कुणाला ऐकायचा नसतो,
म्हणून असाचं हसत जा,
तुटलेलं मन सावरत जा.
कधी तरी मात्र
या हसण्यालाही दम येईल,
त्या दिवशी शांतपणे
स्वतःलाच थोडंसं भेटून जा.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे
Author
Post Views: 3