अपशकुन

मांजर आडवी गेली म्हणून
दुसरी मांजर थांबली जागी
आता काम होणार नाही
चोरून दूध मिळणार नाही ​

भूक मात्र फार लागलेली ​
थांबली थोडी मग निघाली
तिने गाठली खिडकी घराची
वेळ दुपारच्या होती बाराची

भांडं होतं जागेवर
कोणी नव्हते मागावर
संधि हीच साधू या
दूध फस्त करू या

गुपचुप शिरली ती घरात
दुधाचा बेत तिच्या मनात
पाहिलं ​ तिने भांड्यामध्ये ​
दूध नव्हते त्यामध्ये

आवाज येता पळून आली ​
मनात संताप करू लागली
मांजर आडवी गेली म्हणून
काम झालं नाही म्हणू लागली

तेव्हड्यात मांजर दिसली तीच ​
आडवी गेली होती जाताना ​
तोंडाला थोडे लागलेले दूध ​
दिसत होती जिभेने चाटताना ​ ​ ​

विनायक आनिखिंडी, पुणे
9922970317



मांजर आडवी गेली म्हणून
दुसरी मांजर थांबली जागी
आता काम होणार नाही
चोरून दूध मिळणार नाही ​

भूक मात्र फार लागलेली ​
थांबली थोडी मग निघाली
तिने गाठली खिडकी घराची
वेळ दुपारच्या होती बाराची

भांडं होतं जागेवर
कोणी नव्हते मागावर
संधि हीच साधू या
दूध फस्त करू या

गुपचुप शिरली ती घरात
दुधाचा बेत तिच्या मनात
पाहिलं ​ तिने भांड्यामध्ये ​
दूध नव्हते त्यामध्ये

आवाज येता पळून आली ​
मनात संताप करू लागली
मांजर आडवी गेली म्हणून
काम झालं नाही म्हणू लागली

तेव्हड्यात मांजर दिसली तीच ​
आडवी गेली होती जाताना ​
तोंडाला थोडे लागलेले दूध ​
दिसत होती जिभेने चाटताना ​ ​ ​

विनायक आनिखिंडी, पुणे
9922970317

Author