अनुसंधान

इथे केवळ मीच शहाणा
मलाच सारेकाही कळते
दंभ नसावा अहंपणाचा
गर्वाचे घर खाली असते.....

कोण आकाशांतुन पडतो
जन्म एक प्रसवणे असते
एकची न्याय दयाघनाचा
जन्मुनी अंती जाणे असते.....

दिल्याघेतल्याचे नाते इथले
पूर्वकर्मी ऋणमोचन असते
सत्कर्मी अनुसंधान साधावे
तीच एक मोक्षमुक्ती असते.....

वि.ग.सातपुते.( भावकवी )

(9766544908)

रचना क्र.२७३

२७/१०/ २०२२



इथे केवळ मीच शहाणा
मलाच सारेकाही कळते
दंभ नसावा अहंपणाचा
गर्वाचे घर खाली असते…..

कोण आकाशांतुन पडतो
जन्म एक प्रसवणे असते
एकची न्याय दयाघनाचा
जन्मुनी अंती जाणे असते…..

दिल्याघेतल्याचे नाते इथले
पूर्वकर्मी ऋणमोचन असते
सत्कर्मी अनुसंधान साधावे
तीच एक मोक्षमुक्ती असते…..

वि.ग.सातपुते.( भावकवी )

(9766544908)

रचना क्र.२७३

२७/१०/ २०२२

Author