गर्व बाळगावा ज्याचा असं
आपलं आपल्याशी काही नसतं
जे आहे ते कधीच नव्हतं
का हे फारच उशीरा कळतं
माझं माझं असं माझं
माझ्यापाशी काहीच नव्हतं
रुपापासून गुणापर्यंत
आयुष्य सारं उसनं असतं
माझं, असं माझ्यापाशी
होतं का, कधी काही
गुणसूत्रांची उसनवारी
ही आयुष्याची नोंदवही
-यतीन सामंत
गर्व बाळगावा ज्याचा असं
आपलं आपल्याशी काही नसतं
जे आहे ते कधीच नव्हतं
का हे फारच उशीरा कळतं
माझं माझं असं माझं
माझ्यापाशी काहीच नव्हतं
रुपापासून गुणापर्यंत
आयुष्य सारं उसनं असतं
माझं, असं माझ्यापाशी
होतं का, कधी काही
गुणसूत्रांची उसनवारी
ही आयुष्याची नोंदवही
-यतीन सामंत