साहित्य: -१ जुडी मेथी (निवडून बारीक चिरून घ्यावी), ४ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, २ सपाट वाट्या मैदा, १ चमचा लिंबाचा रस, ३ उकडून किसलेले बटाटे, ४ चमचे तेल मोहनाकरिता, १ चमचा आले-लसूण पेस्ट, मीठ चवीपुरते, तळण्याकरिता तेल.
कृती: -वरील सर्व साहित्य एकत्र करून मळून घ्यावे. लिंबाएवढे गोळे करून ते चपटे करून त्याला हवा तसा आकार द्यावा व गरम तेलामध्ये मंद आचेवर तळावेत. एका डिशमध्ये ठेवावेत.
गरमच खाण्यास द्यावे.
Author
Post Views: 6
