साहित्य: पाव किलो मटण लहान तुकडे करून, ३ कांदे लहान फोडी करून, ३ टोमॅटो मोठ्या फोडी करून, २ भोपळी मिरच्या बिया काढून फोडी करून, अर्धा चिरलेला पुदिना, १ कप एग नूडल्स, २ टे.स्पून अमूल बटर, अर्धा टी स्पून किसलेले आले-लसूण, चवीपुरते मीठ, मिरेपावडर.
कृती: वेळ: : ३५ मिनिटे प्रथम मटण स्वच्छ धुऊन घ्यावे. दोन कप पाणी घालून प्रेशर कुकरमध्ये शिजवावे. मटण शिजल्यावर उतरवून गाळावे. हाडे काढून टाकून मटणाचा हाताने चुरा करावा. पाणी व मटण वेगवेगळे ठेवावे.
जाड बुडाच्या पातेल्यात लोणी घालून त्यावर कांदे, टोमॅटो परतावे. किसलेले आले-लसूण घालावे. पुदिना, मीठ, मिरेपावडर, भोपळी मिरच्यांचे तुकडे घालून परतावे. २ कप पाणी घालून कांदा शिजेपर्यंत मंद विस्तवावर झाकण ठेऊन शिजवावे. त्यात वर शिजवलेले मटण व पाणी घालून उकळत ठेवावे. एक उकळी आल्यावर एग नूडल्स साधारण चुरून घालाव्यात. नूडल्स शिजल्यावर उतरवावे.
आवडत असल्यास बाऊलमध्ये सूप दिल्यावर किसलेले चीज वरून घालावे. हे सूप थोडे वेगळे पण चविष्ट लागते.