बरकत आलेल्या व्यवसायात स्थिरावले की, शारीरिक चपळाई कमी होण्याचा धोका असतो. कोल्हापूरच्या आकाश कोरगावकर ने एमबीए झाल्यावर पेट्रोल पंपाच्या व्यवसायावर पकड मिळवलीच, पण त्याचवेळी स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतराजीतल्या साहसस्पर्धेत महाराष्ट्राचे नाव नेले. चार किलोमीटर पोहणे, ४२ किलोमीटर धावणे आणि १८० किलोमीटर सायकलिंग असा तिहेरी प्रवास त्याने १० तास ६ मिनिटांत पार केला…
त्याचे ‘आकाश’ च वेगळे