जन्म-१९२२,पुणे
मृत्यू-२००९; मुंबई
अहिल्या रांगणेकर या मराठी राजकारणी व भारतीय कम्युनिस्ट (मार्क्सवादी) पक्षाच्या नेत्या होत्या. साम्यवादी नेते भालचंद्र रणदिवे हे त्यांचे थोरले बंधू होते.
अहिल्याबाईंचा विवाह १९४५ साली साम्यवादी चळवळीतले त्यांचे सहयोगी पी.बी. रांगणेकरांशी झाला होता.
१९७५ साली आणीबाणीच्या काळात मृणाल गोर्यांच्या साथीने महागाई विरोधात आंदोलन छेडल्याने त्यांना तुरुंगात जावे लागले होते. भारत-चीन युद्धकाळात त्यासुध्दा इतर साम्यवादी नेत्यांप्रमाणे नजरकैदेत होत्या.
१९४३ सालापासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्या, १९७५ सालापासून केंद्रीय समिती सभासद, व १९८३ ते १९८६ पक्षाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश चिटणीस.
१९७७ ते १९८० या कालावधीसाठी उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवड.
१९६१ ते १९८० मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका
१९७९ साली इंडियन ट्रेड युनियन या उपाध्यक्ष.