आत्म्याचे रूप

बिलोरी दिसते प्रतिबिंब
तेच कां ? रुपडे आपुले
कसा ? शोधावा आत्मा
कोणते ? रूप ते आगळे।।

माया सारीच दयाघनाची
रुपात, साऱ्या तोच एक
देही, तो चिरंजीव आत्मा
दावितो जगण्याचे सोहळे।।

जीव! सृष्टीत या विनाशी
कृपावंत! तो जगविणारा
जाणावे, त्यालाच निरंतर
रूप आपुले त्यात दडलेले।।

-- वि.ग.सातपुते. (भावकवी)

9766544908

रचना क्र.३३.

२ - २ - २०२२.



बिलोरी दिसते प्रतिबिंब
तेच कां ? रुपडे आपुले
कसा ? शोधावा आत्मा
कोणते ? रूप ते आगळे।।

माया सारीच दयाघनाची
रुपात, साऱ्या तोच एक
देही, तो चिरंजीव आत्मा
दावितो जगण्याचे सोहळे।।

जीव! सृष्टीत या विनाशी
कृपावंत! तो जगविणारा
जाणावे, त्यालाच निरंतर
रूप आपुले त्यात दडलेले।।

— वि.ग.सातपुते. (भावकवी)

9766544908

रचना क्र.३३.

२ – २ – २०२२.

Author