आत्मविश्वास

आत्मविश्वास जागृत ठेवूनी, कार्य घेवूनी तडीस नेती ।

कधीही न राही अवलंबूनी, मदतीसाठी दूजा वरती ।।

ईश्वर करीतो मदत तयांना, मदत करी जे आपले आपण ।

आपल्यातची तो ईश्वर आहे, असते याची जयास जाण ।।

विश्वासाने हुरूप येई, जागृत करीती अंतर चेतना ।

लक्ष्य सारे केंद्रीत होता, यश चमकते प्रयत्नांना ।।

-- डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

— डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Author