आठवण

अनामिक जे होते पूर्वी, साद प्रेमाची ऐकू आली ।

योग्य वेळ येतां क्षणी, हृदये त्यांची जूळूनी गेली ।।

शंका भीती आणि तगमग, असंख्य भाव उमटती मनी ।

विजयी झाले ऋणाणू बंध, बांधले होते हृदयानी ।।

उचंबळूनी दाटूनी आला, हृदयामधला ओलावा ।

स्नेह मिळता प्रेम मिळाले, जगण्यासाठी दुवा ठरावा ।।

मनी वसविल्या घर करूनी, क्षणीक सुखांच्या आठवणी ।

जगण्यासाठी उभारी देतील, शरीर मनाच्या दु:खी क्षणी ।।

-- डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

— डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

Author