आमचे खेळ

या मित्रांनो सारे या,
सर्व मिळूनी खेळू या ।।धृ।।

खेळ आमच्या देशाचे
गरिबांसाठी सोईचे

मैदान नको मोठे ते
वस्तूही अल्प लागते
।।
खेळांना त्या समजून घ्या -
--- या मित्रांनो सारे या,

हुतुतूचा खेळ बघा
दोन गट, छोटी जागा

स्पर्श रेषा ओलांडूनी
ह्तुतू म्हणती तोंडानी
।।
एकाच दमात भिडू मारू या -
--- या मित्रांनो सारे या,

खो खो मध्ये चपळाई
चकमा देण्याची घाई

उलट सुलट बसे
एकाच रांगेत दिसे
।।
मिळता खो भिडूला पकडू या -
--- या मित्रांनो सारे या,

लपंडाव हा खेळ कसा
लपलेल्यांना शोधत बसा

राज्य येते त्यावरती
शोध घेई सभोवती
।।
तीक्ष्ण नजर ती ठेऊया –
--- या मित्रांनो सारे या,

आट्या पाट्या च्या खेळात
कांही घरे आखतात

सीमेवरती दक्ष राहती
घरात येण्या ते रोकती
।।
चपळाईने घरात शिरू या –
--- या मित्रांनो सारे या,

एका पायाची गम्मत
लंगडी आहे माहित?

उड्या मारीत पळावे
भिडू सारे पकडावे
।।
आखल्या रेषेतच खेळू या -
--- या मित्रांनो सारे या,

एक दिलाने खेळू या
आनंद सारा लुटू या

निरोगी सदा राही तो
प्रफुल्ल मन बाळगतो
।।
शीण अभ्यासाचा घालवू या –
---
मित्रांनो सारे या,

-- डॉ. भगवान नागापूरकर
9004079850
bknagapurkar@gmail.com



या मित्रांनो सारे या,
सर्व मिळूनी खेळू या ।।धृ।।

खेळ आमच्या देशाचे
गरिबांसाठी सोईचे

मैदान नको मोठे ते
वस्तूही अल्प लागते
।।
खेळांना त्या समजून घ्या
या मित्रांनो सारे या,

हुतुतूचा खेळ बघा
दोन गट, छोटी जागा

स्पर्श रेषा ओलांडूनी
ह्तुतू म्हणती तोंडानी
।।
एकाच दमात भिडू मारू या
या मित्रांनो सारे या,

खो खो मध्ये चपळाई
चकमा देण्याची घाई

उलट सुलट बसे
एकाच रांगेत दिसे
।।
मिळता खो भिडूला पकडू या
या मित्रांनो सारे या,

लपंडाव हा खेळ कसा
लपलेल्यांना शोधत बसा

राज्य येते त्यावरती
शोध घेई सभोवती
।।
तीक्ष्ण नजर ती ठेऊया –
या मित्रांनो सारे या,

आट्या पाट्या च्या खेळात
कांही घरे आखतात

सीमेवरती दक्ष राहती
घरात येण्या ते रोकती
।।
चपळाईने घरात शिरू या –
या मित्रांनो सारे या,

एका पायाची गम्मत
लंगडी आहे माहित?

उड्या मारीत पळावे
भिडू सारे पकडावे
।।
आखल्या रेषेतच खेळू या –
या मित्रांनो सारे या,

एक दिलाने खेळू या
आनंद सारा लुटू या

निरोगी सदा राही तो
प्रफुल्ल मन बाळगतो
।।
शीण अभ्यासाचा घालवू या –
मित्रांनो सारे या,

— डॉ. भगवान नागापूरकर
9004079850
bknagapurkar@gmail.com

Author