श्रेष्ठ गायिका किशोरी आमोणकर यांना श्रद्धांजली

आज श्रेष्ठ गायिका मा.किशोरी आमोणकर यांचे निधन झाले.

किशोरी आमोणकर यांचा जन्म १० एप्रिल १९३१ रोजी झाला. त्यांना आदराने 'गानसरस्वती' असे संबोधले जाई.

त्यांच्या आई म्हणजे प्रख्यात गायिका मा.मोगूबाई कुर्डीकर. मा.किशोरी आमोणकर यांनी आपल्या आईकडून संगीताचे ज्ञान तर घेतलेच, शिवाय विविध संगीत घराण्यांच्या गुरूंकडूनही मार्गदर्शन घेतले. त्या मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजमध्ये शिकल्या.

त्यांचे पती मा.रवी आमोणकर हे अध्यापन क्षेत्रात होते. त्या श्री राघवेंद्र स्वामींच्या भक्त होत्या.

किशोरीताईंनी १९५० चे दरम्यान आपल्या व्यावसायिक कारकीर्दीस प्रारंभ केला. हिंदी चित्रपट 'गीत गाया पत्थरोंने' साठी त्यांनी पार्श्वगायन केले आहे. १९९१ मध्ये प्रसारित झालेल्या 'दृष्टी' ह्या हिंदी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शनही त्यांनी केले होते. मा.किशोरी आमोणकर या त्यांच्या शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय गायनासाठी प्रसिद्ध होत्या. ख्याल गायकी बरोबरच त्या ठुमरी, भजन इत्यादी गायन प्रकारांना प्रभावीपणे सादर करत. कंठसंगीतावर वर्षानुवर्षे कठोर परिश्रम, सराव आणि अंगभूत प्रतिभेमुळे किशोरीताईंचे गाणे कसदार होते व रसिकांच्या हृदयाचा ठाव घेते. त्यांनी आजवर देशोदेशी आपले संगीत कार्यक्रम केले असून भारतातील प्रमुख संगीत महोत्सवांत त्यांना आपली कला सादर करण्यासाठी सन्मानपूर्वक बोलावले जात असे. त्यांनी 'स्वरार्थरमणी - रागरससिद्धान्त' हा संगीतशास्त्रावरील ग्रंथ लिहिला आहे.

आरती अंकलीकर, माणिक भिडे, पद्मा तळवलकर, अरुण द्रविड, सुहासिनी मुळगांवकर, रघुनंदन पणशीकर, मीरा पणशीकर, मीना जोशी, नंदिनी बेडेकर, विद्या भागवत, माया उपाध्याय, किशोरीताईंची नात तेजश्री आमोणकर, व्हायोलिन वादक मिलिंद रायकर यांसह अनेक कलावंत किशोरीताईंच्या शिष्यवर्गांत मोडतात.

किशोरी आमोणकर यांना मराठीसृष्टी परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.

-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

किशोरी आमोणकर यांचे गायन
अवघा रंग एक झाला.
https://www.youtube.com/watch?v=5p5hy-2AjTA
https://www.youtube.com/watch?v=FglVACXnQIk
https://www.youtube.com/watch?v=VylhIJF50sI
https://www.youtube.com/watch?v=zLgXP-WvXLM
https://www.youtube.com/watch?v=ddimw49-waw
https://www.youtube.com/watch?v=RSba7WebiXo

आज श्रेष्ठ गायिका मा.किशोरी आमोणकर यांचे निधन झाले.

किशोरी आमोणकर यांचा जन्म १० एप्रिल १९३१ रोजी झाला. त्यांना आदराने ‘गानसरस्वती’ असे संबोधले जाई.

त्यांच्या आई म्हणजे प्रख्यात गायिका मा.मोगूबाई कुर्डीकर. मा.किशोरी आमोणकर यांनी आपल्या आईकडून संगीताचे ज्ञान तर घेतलेच, शिवाय विविध संगीत घराण्यांच्या गुरूंकडूनही मार्गदर्शन घेतले. त्या मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजमध्ये शिकल्या.

त्यांचे पती मा.रवी आमोणकर हे अध्यापन क्षेत्रात होते. त्या श्री राघवेंद्र स्वामींच्या भक्त होत्या.

किशोरीताईंनी १९५० चे दरम्यान आपल्या व्यावसायिक कारकीर्दीस प्रारंभ केला. हिंदी चित्रपट ‘गीत गाया पत्थरोंने’ साठी त्यांनी पार्श्वगायन केले आहे. १९९१ मध्ये प्रसारित झालेल्या ‘दृष्टी’ ह्या हिंदी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शनही त्यांनी केले होते. मा.किशोरी आमोणकर या त्यांच्या शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय गायनासाठी प्रसिद्ध होत्या. ख्याल गायकी बरोबरच त्या ठुमरी, भजन इत्यादी गायन प्रकारांना प्रभावीपणे सादर करत. कंठसंगीतावर वर्षानुवर्षे कठोर परिश्रम, सराव आणि अंगभूत प्रतिभेमुळे किशोरीताईंचे गाणे कसदार होते व रसिकांच्या हृदयाचा ठाव घेते. त्यांनी आजवर देशोदेशी आपले संगीत कार्यक्रम केले असून भारतातील प्रमुख संगीत महोत्सवांत त्यांना आपली कला सादर करण्यासाठी सन्मानपूर्वक बोलावले जात असे. त्यांनी ‘स्वरार्थरमणी – रागरससिद्धान्त’ हा संगीतशास्त्रावरील ग्रंथ लिहिला आहे.

आरती अंकलीकर, माणिक भिडे, पद्मा तळवलकर, अरुण द्रविड, सुहासिनी मुळगांवकर, रघुनंदन पणशीकर, मीरा पणशीकर, मीना जोशी, नंदिनी बेडेकर, विद्या भागवत, माया उपाध्याय, किशोरीताईंची नात तेजश्री आमोणकर, व्हायोलिन वादक मिलिंद रायकर यांसह अनेक कलावंत किशोरीताईंच्या शिष्यवर्गांत मोडतात.

किशोरी आमोणकर यांना मराठीसृष्टी परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.

— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

किशोरी आमोणकर यांचे गायन
अवघा रंग एक झाला.

Author