प्रभूची धांवपळ

चकीत झालो बघूनी, प्रभूला दारावरी,
त्रिशूळ घेऊनी हातीं, आला होता जटाधारी ।।१।।

क्षणीक थांबूनी दारावरती, गेला तो निघूनी,
बहूत वेळ येत राहिला, दार ना ओलांडले त्यांनी ।।२।।

कळले नाहीं मजला, ही त्याची रीत,
विचार करीता मनी, जाणली मी ही गम्मत ।।३।।

उपास तापास करुनी, देह शुद्ध केला,
भजन पूजन करुनी, तप मिळाले मजला ।।४।।

गुंतले होते माझे मन, संसारातील मोहांत,
राग लोभ अहंकार, मुरले होते अंगात ।।५।।

मान देऊनी तपशक्तिला, येत होता ओढूनी,
अशांतता बघूनी मनातील, जात होता परतोनी ।।६।।

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →