निसर्गाची आनंदासाठी मदत

कसे मानूं उपकार
निसर्गा तूझे मी
उघडोनी जीवन द्वार
आलास तूं कामी
तुझ्या मोरानें दाखविले नृत्य
राघूच्या वाणीनें शिकविले सत्य
कोकीळेचे गान सप्तसुरांच्या लहरी
चित्रकलेचे ज्ञान इंद्रधनुष्या परि
मुंग्याची वारुळे दाखवी वास्तूकला
कोळ्याची जाळे शिकवी हस्तकला
घारीची भरारी स्वछंद केले मनां
मैनेच्या उदरीं जाणला प्रेमळपणा
विजेची चपळता चंचल बनवी
धबधब्याची प्रचंडता श्रेष्ठत्व जाणवी
निसर्गातील विवीधता देई माणसा ज्ञान
करी त्यास मदत, आनंदी होण्या जीवन

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com



कसे मानूं उपकार
निसर्गा तूझे मी
उघडोनी जीवन द्वार
आलास तूं कामी
तुझ्या मोरानें दाखविले नृत्य
राघूच्या वाणीनें शिकविले सत्य
कोकीळेचे गान सप्तसुरांच्या लहरी
चित्रकलेचे ज्ञान इंद्रधनुष्या परि
मुंग्याची वारुळे दाखवी वास्तूकला
कोळ्याची जाळे शिकवी हस्तकला
घारीची भरारी स्वछंद केले मनां
मैनेच्या उदरीं जाणला प्रेमळपणा
विजेची चपळता चंचल बनवी
धबधब्याची प्रचंडता श्रेष्ठत्व जाणवी
निसर्गातील विवीधता देई माणसा ज्ञान
करी त्यास मदत, आनंदी होण्या जीवन

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →