मंगल मंदिर हे माझे माहेर

मंगल मंदिर हे माझे माहेर - मंगल....
जगावेगळे असे हो सुंदर - असे हो सुंदर
मंगल मंदिर हे माझे माहेर धृ

हिरवागार अती परिसर त्याचा
प्रासादची जणु शिवरायांचा
प्रांगणात या विश्वकर्मा
आत भवानीचे सुंदर मंदिर - जगावेगळे... १

आकार मोठा तरीही बैठा
आंत आहे हो भव्य दिव्यता
देव-देवींच्या संत विभूतींच्या
मूर्ती असती नयन मनोहर - जगावेगळे... २

मारूती राया प्रवेश द्वारी
रिध्दी सिध्दी सह गणेश स्वारी
श्री राम जानकी लक्ष्मण हनुमंत
लोचन खिळती हो त्यांच्यावर - जगावेगळे... ३

शिवपिंडीवर भुजंग फणीधर
फणा उभारी ऐकुनिया स्वर
पुढे सावळा हा मुरलीधर
मुरली वाजवी मंजुळ सुस्वर - जगावेगळे...

संत विभूतींच्या सजीव मूर्ती
साई बाबा अन् समर्थ स्वामी
संत गजानन आशिष देती
सदैव राहे शिरी त्याचा कर - जगावेगळे... ५

गाभार्‍या मधी तुळजामाता
प्रगट जाहली ही अष्टभूजा
श्री दत्तात्रय, रखुमाई विठ्ठल
लक्ष्मी नारायण रेखीव सुंदर - जगावेगळे... ६

छत्रपती श्री शिवाजी राजे
सिहासनावरी येथे विराजले
आदराने त्यांच्या पुढे झुकते माथे
सदा घुमवा त्यांचा जयजयकार - जगावेगळे... ७

इथे बाजुला ठायी ठायी
शिल्पकलेची अपूर्व संचयी
छोटासा हा विधी-विनायक
कृपाछत्र हा धरी भक्तांवर - जगावेगळे... ८

वृक्षलतां मधे आहे शिवालय
त्यात बैसले भोळे शंकर
इथेच आहे पवित्र निर्मळ
सकळ जनांना भवानी सागर - जगावेगळे... ९

स्वयंभू येथे हा औदूंबर
छाया देई तो सकलांवर
पारावरती छोटे मंदीर
त्यात बैसले दत्त दिगंबर - जगावेगळे... १०

गायवासरांसवे अंगणी
पान्हा देई झरझर झरझर
येथील स्वामिनी चंदाराणी
ममतेला तिच्या अफाट पाझर - जगावेगळे... ११

माय माउली एक मागणे
ओटीत देग अहेव लेणे
आम्हा लेकींना प्रसन्न होऊनी
वरद हस्त हा ठेव शिरावर - जगावेगळे... १२

"माय भवानीत" या हो आता
विसरू न येथील कलाकुशलता
गोड घास हा देई तृप्तता
गुणीजन येथिल सेवा तत्पर - जगावेगळे... १३

आमुची ताई चंदाराणी
ओठी आहे अमृतवाणी
तुळजाईचे रूप घेऊनी
प्रेमळ कर हा ठेवी शिरावर - जगावेगळे... १४

असे हे माहेर अशी ही ताई
भेटी साठी आतुर होई
कोड कौतुका पारच नाही
मायेची ही घाला पाखर - जगावेगळे... १५

( वरील काव्य वरसगांव येथील श्री शिवभवानीचे सुंदर मंदिर व तेथील रम्य परिसराचे दर्शन घेतल्यावर तृप्त मनाने चिंतन करीत असताना उत्स्फुर्त पणे श्री तुळजा भवानी व सौ. ताई यांच्या प्रेमळ आशिर्वादाने रचले आहे.)

- गुलाब अरविंद प्रधान



मंगल मंदिर हे माझे माहेर – मंगल….
जगावेगळे असे हो सुंदर – असे हो सुंदर
मंगल मंदिर हे माझे माहेर धृ

हिरवागार अती परिसर त्याचा
प्रासादची जणु शिवरायांचा
प्रांगणात या विश्वकर्मा
आत भवानीचे सुंदर मंदिर – जगावेगळे… १

आकार मोठा तरीही बैठा
आंत आहे हो भव्य दिव्यता
देव-देवींच्या संत विभूतींच्या
मूर्ती असती नयन मनोहर – जगावेगळे… २

मारूती राया प्रवेश द्वारी
रिध्दी सिध्दी सह गणेश स्वारी
श्री राम जानकी लक्ष्मण हनुमंत
लोचन खिळती हो त्यांच्यावर – जगावेगळे… ३

शिवपिंडीवर भुजंग फणीधर
फणा उभारी ऐकुनिया स्वर
पुढे सावळा हा मुरलीधर
मुरली वाजवी मंजुळ सुस्वर – जगावेगळे…

संत विभूतींच्या सजीव मूर्ती
साई बाबा अन् समर्थ स्वामी
संत गजानन आशिष देती
सदैव राहे शिरी त्याचा कर – जगावेगळे… ५

गाभार्‍या मधी तुळजामाता
प्रगट जाहली ही अष्टभूजा
श्री दत्तात्रय, रखुमाई विठ्ठल
लक्ष्मी नारायण रेखीव सुंदर – जगावेगळे… ६

छत्रपती श्री शिवाजी राजे
सिहासनावरी येथे विराजले
आदराने त्यांच्या पुढे झुकते माथे
सदा घुमवा त्यांचा जयजयकार – जगावेगळे… ७

इथे बाजुला ठायी ठायी
शिल्पकलेची अपूर्व संचयी
छोटासा हा विधी-विनायक
कृपाछत्र हा धरी भक्तांवर – जगावेगळे… ८

वृक्षलतां मधे आहे शिवालय
त्यात बैसले भोळे शंकर
इथेच आहे पवित्र निर्मळ
सकळ जनांना भवानी सागर – जगावेगळे… ९

स्वयंभू येथे हा औदूंबर
छाया देई तो सकलांवर
पारावरती छोटे मंदीर
त्यात बैसले दत्त दिगंबर – जगावेगळे… १०

गायवासरांसवे अंगणी
पान्हा देई झरझर झरझर
येथील स्वामिनी चंदाराणी
ममतेला तिच्या अफाट पाझर – जगावेगळे… ११

माय माउली एक मागणे
ओटीत देग अहेव लेणे
आम्हा लेकींना प्रसन्न होऊनी
वरद हस्त हा ठेव शिरावर – जगावेगळे… १२

“माय भवानीत” या हो आता
विसरू न येथील कलाकुशलता
गोड घास हा देई तृप्तता
गुणीजन येथिल सेवा तत्पर – जगावेगळे… १३

आमुची ताई चंदाराणी
ओठी आहे अमृतवाणी
तुळजाईचे रूप घेऊनी
प्रेमळ कर हा ठेवी शिरावर – जगावेगळे… १४

असे हे माहेर अशी ही ताई
भेटी साठी आतुर होई
कोड कौतुका पारच नाही
मायेची ही घाला पाखर – जगावेगळे… १५

( वरील काव्य वरसगांव येथील श्री शिवभवानीचे सुंदर मंदिर व तेथील रम्य परिसराचे दर्शन घेतल्यावर तृप्त मनाने चिंतन करीत असताना उत्स्फुर्त पणे श्री तुळजा भवानी व सौ. ताई यांच्या प्रेमळ आशिर्वादाने रचले आहे.)

– गुलाब अरविंद प्रधान

Author