हे कराल का ?

कशासाठी जगतो आपण, विचार तुम्हीं करतां कां ?
मृत्यू येई तो जगावयाचे, हेच धोरण समजतां कां ?

खाणे – पिणें वंश वाढविणे, हेच जीवन असते कां ?
ऐष आरामी राहूनी तुम्ही, देहासाठी सारे, हे मानता का ?

पाठीं लागूनी धनाच्या त्या, बरोबर संपत्ती न्याल कां ?
पैसा मुलांसाठी ठेऊन ही, शिव्या त्यांच्या चुकवाल कां ?

सारे कळूनी वळत नसते, तत्व हे जाणून घ्याल कां ?
उपयोग करूनी ज्ञानाचा, जीवन चांगले कराल कां ?

सारे आहे प्रभूचे समजून, शांत चित्ताने जगाल कां ?
दया क्षमा शांती हे गुण, अंगी आपुल्या बाणाल कां ?

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com

Author