उंचावून झेप, नको घेवू उडी
खोल आहे दरी, पाय तुझा मोडी…१
अंदाज घे तूं, खोलीचा प्रथम
यश येई तुला, तया मध्यें ठाम…२
अनुमान काढ, आपल्या शक्तीचे
झेपेल कां ते, विचार युक्तीचे…३
निर्णय घ्यावेस, सदा विचारांनी
निराश न होई, त्यामध्ये कुणी….४
जाणून घे तूं, स्वत:ची पात्रता
यश असे पाठी, ज्याची जी योग्यता…५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
Author
Post Views: 12