दुष्टपणा

दगड टाकतां पाण्यावरी, तरंगे त्याची दिसून आली ।
दगड होई स्थीर तळाशी, बराच वेळ लाट राहीली...१,

जेव्हा कुणीतरी क्रोध करी, वातावरण दूषित होते ।
क्रोध जातो त्वरीत निघूनी, दूषितपणा कांहीं काळ राहते...२,

निर्मळपणा दिसून येई, स्थिर होवून जातां जल ।
पुनरपि पडता खडा क्रोधाचा, सारे होवून जाते गढूळ...३,

स्थिर होण्यास वेळ लागतो, गढूळ होई क्षणांत
मन जिंकणे कठीण असता, वैमनस्य सहज होत...४

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

दगड टाकतां पाण्यावरी, तरंगे त्याची दिसून आली ।
दगड होई स्थीर तळाशी, बराच वेळ लाट राहीली…१,

जेव्हा कुणीतरी क्रोध करी, वातावरण दूषित होते ।
क्रोध जातो त्वरीत निघूनी, दूषितपणा कांहीं काळ राहते…२,

निर्मळपणा दिसून येई, स्थिर होवून जातां जल ।
पुनरपि पडता खडा क्रोधाचा, सारे होवून जाते गढूळ…३,

स्थिर होण्यास वेळ लागतो, गढूळ होई क्षणांत
मन जिंकणे कठीण असता, वैमनस्य सहज होत…४

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Author