“अ”ते”ज्ञ”चा मार्ग

अ,आ,इ,ई,उ,ऊ, गिरवित
पाटी पुस्तक हातीं घेतले
ह,ळ,क्ष,ज्ञ, करुनी शेवटीं
खरेच मजला ज्ञान मिळाले

आरंभातील ' अ ' शिकूनी
अहंकार तो जागृत झाला
तो तर राजा षढरिपूचा
ज्ञानास त्याने दुर सारला

अज्ञान- राज्यामघ्यें भटकतां
स्वतःशी गेलो विसरुनी
ज्ञानी झालो आहोंत आपण
समजे चार पुस्तके वाचूनी

हालके हालके पुढे चाललो
'अ' 'आ' सोडूनी 'क्ष' ज्ञ' पर्यंत
ज्ञान प्राप्त ते मज जहाले
अंहंकाराचा होऊनी अंत

'ज्ञ' ज्ञानाचा तेंव्हांच जाणले
अहंकारातील ल'अ' विसरतां
'अ' आणि 'ज्ञ' साधूनी
अंतर् ज्ञानात डुबून जातां

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail – bknagapurkar@gmail.com



अ,आ,इ,ई,उ,ऊ, गिरवित
पाटी पुस्तक हातीं घेतले
ह,ळ,क्ष,ज्ञ, करुनी शेवटीं
खरेच मजला ज्ञान मिळाले

आरंभातील ‘ अ ‘ शिकूनी
अहंकार तो जागृत झाला
तो तर राजा षढरिपूचा
ज्ञानास त्याने दुर सारला

अज्ञान- राज्यामघ्यें भटकतां
स्वतःशी गेलो विसरुनी
ज्ञानी झालो आहोंत आपण
समजे चार पुस्तके वाचूनी

हालके हालके पुढे चाललो
‘अ’ ‘आ’ सोडूनी ‘क्ष’ ज्ञ’ पर्यंत
ज्ञान प्राप्त ते मज जहाले
अंहंकाराचा होऊनी अंत

‘ज्ञ’ ज्ञानाचा तेंव्हांच जाणले
अहंकारातील ल’अ’ विसरतां
‘अ’ आणि ‘ज्ञ’ साधूनी
अंतर् ज्ञानात डुबून जातां

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail – bknagapurkar@gmail.com

Author