वृद्धाश्रम

ठाणे भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ऊर्मिला भूतकर यांची कविता..



अरे आमच्या लेकरा लेकरा !

का रे धाडतो आम्हा वृध्दाश्रमा !!१!!

काय गुन्हा रे आम्हीच केला !

नऊ मास नऊ दिस गर्भ वाढविला !!२!!

शिक्षण देऊनी तुज ज्ञानी केले !

असे कसे ते पांग फेडिले !!३!!

उपाशी पोटी तुला भरविले !

एका वस्त्रावरी दिस काढले !!४!!

आदर्श तो कां नाही ठेवायचा !

श्रावण बाळाच्या त्या सेवेचा !!५!!

भक्त पुंडलिक माय-पिता सेवेसाठी !

उभे ठेविले पांडुरंगा विटेवरी जगजेठी !!६!!

एकच आशा उरते मनात !

मन रमवावे ते नातवंडात !!७!!

यासाठी पदर पसरिते, तुला विनविते !

नको तोडू रे मायेला, नातवंडांना आम्हाते !!८!!

अरे, आमच्या लेकरा लेकरा !

कां रे धाडतो आम्हां वृध्दाश्रमा !!९!!

— उर्मिला प्र. भुतकर

ठाणे भूषण

Author